
पुढारी ऑनलाईन : पुढील २ ते ३ दिवसांत उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात आज ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून जोरदार सरीची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Maharashtra Weather Forecast)