रत्नागिरी – चोरी करताना चोरटे अनेक शक्कल लढवतात. हे अनेक चोऱ्यांमधून निदर्शनास येते शनिवारी (ता. ११) मात्र एका वृद्ध महिलेने बस स्थानक येथे चोरी करून चक्क सोन्याची चेन तत्काळ गिळल्याचा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आला आहे.
सोन्याची चेन वृद्ध महिलेने पळविली
चोरी करणारी महिला सातारा जिल्ह्याची असल्याचे समजते. येथील एसटी बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलेची सोन्याची चेन वृद्ध महिलेने पळविली. महिलेने चेन चोरल्याचे आढळल्यावर प्रवासी महिलेने तिच्याशी चौकशी केली. मात्र तिच्याकडे चेन मिळून आली नाही.तिने ती चेन गिळल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रवासी महिलेने पोलिसांना याबाबत वृत्तांत सांगितला. यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ संशयित वृद्ध महिलेला ताब्यात घेतले आहे. तिला सोनोग्राफीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.
वाचा – एसटी स्टॅंडवर रात्री बाराला एकट्या महिलेला पोलिसांनी पाहिले अन्…
मात्र, जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा नसल्यामुळे एक्स-रे काढून त्यात चेन दिसते का ते पाहिले जात आहे. सायंकाळीपर्यंत या घटनेचा पोलिसांकडून मागोवा घेण्यात येत होता. सोनोग्राफी केल्यास वृद्ध महिलेच्या शरीरात असलेली चेन निदर्शनास तत्काळ येईल, अशी चर्चा रुग्णालयात सुरू
होती.

News Story Feeds