कणकवली – एसटी महामंडळाने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पेपरलेस तिकीट अर्थात स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 32 हजार 422 प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे.
महा ई सेवा केंद्रावर स्मार्ट कार्डची नोंदणी
एसटी महामंडळाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नव्या योजना राबवल्या जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवासात सूट दिली जाते. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत देण्यात आलेली आहे. ही सेवा अजूनही ही प्रभावीपणे प्रत्येकाला मिळावी यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू झाली आहे. या पूर्वीचे स्मार्ट कार्ड योजना फारशी सोयीची नव्हती. त्यानंतर या योजनेत बदल करण्यात आला आहे आता विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक यांचे आधार कार्ड ऑनलाईन नोंदणी करून स्मार्ट कार्ड वितरित केले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक एसटी बस आगारात आणि महा ई सेवा केंद्रावर स्मार्ट कार्डची नोंदणी करता येते. गेले काही महिने ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 32 हजार 422 प्रवाशाने विविध केंद्रांवर स्मार्ट कार्डसाठी आपली नोंदणी केली असून जवळपास 21 हजार 929 प्रवाशांना स्मार्ट कार्ड उपलब्ध होऊन त्या स्मार्ट कार्डवर प्रवासही सुरू झाला आहे. हे स्मार्ट कार्ड एक महिना किंवा तीन महिन्यासाठी रिचार्ज करता येते स्मार्ट कार्ड प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता राहत नाही. वाहकाकडे स्मार्टकार्ड दिल्यानंतर आपल्याला निश्चित केलेल्या ठिकाणी एसटी बसमधून प्रवास करता येतो.
वाचा – धक्कादायक… चोरी केलेली सोन्याची चेन महिलेने गिळली…!
जिल्ह्यातून 2500 स्मार्ट कार्ड नोंदणी
जिल्ह्यात आतापर्यंत देवगड तालुक्यांमध्ये 6451, कुडाळ तालुक्यात 6912, कणकवलीत 6000, मालवण तालुक्यात 3904, सावंतवाडीत 6600, विजयदुर्ग मध्ये 130 आणि वेंगुर्ले आगारा अंतर्गत 2500 स्मार्ट कार्ड नोंदणी झाली आहे. स्मार्ट कार्ड नोंदणीची मुदत एस टी महामंडळ वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने एसटी बस डेपो किंवा ई सेवा केंद्रावर नोंदणी झाल्यानंतर प्रवाशांना महिन्या -दीड महिन्यांमध्ये स्मार्ट कार्ड प्राप्त होते.

News Story Feeds