निर्विवाद वर्चस्व आणि विकासकामे करूनही मतांसाठी शिवसेनेला कसरत करावी लागली. माळनाक्यापासून वरचा भाग शिवसेनेने बांधून ठेवला आहे. मात्र, त्यातील चाळीस ते पन्नास टक्के मते विरोधकांना गेली. प्रत्येक प्रभागामध्ये हक्काचा नगरसेवक होता, तरी आघाडी कमी मिळाली. याचा अर्थ शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा थेट जनतेशी संबंध कमी, असा काढला जात आहे. लोकांशी नाळ जोडा, त्यांची कामे करा, असा निर्वाणीचा इशारा आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
क्लिक करा- कोकणात भरारी सायकल सवारी ….
मतदान कमी झाले तरी…
यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला मताधिक्य दिलेल्या प्रभागांत देखील शिवसेनेला अल्प मताधिक्य आहे. बंड्या साळवी यांना 1 ते 6 आणि 11 व 15 या प्रभागांनी तारले आहे. ऍड. दीपक पटवर्धन यांना 1, 6, 9, 10, 14 या प्रभागात चांगली मते मिळाली तर 4, 7, 8, 12, 14 आणि 15 या प्रभागांमध्ये मिलिंद कीर यांना चांगली मते मिळाली. शिवसेनेला शहरामध्ये आपला फिक्स मतदार तयार करण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.
हेही वाचा- कोकणातल्या या सौभाग्यवतीच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकूट
लोकसभेला राऊत यांना 19 हजार, विधानसभेला सेनेळा 16 हजार मते मिळाली. ती निम्मी केली तरी भाजपची 8 हजार मते आहेत. राहुल पंडित निवडून आले, तेव्हा 14 हजार मते मिळाली होती. आता साळवींना 10 हजार 7 मते मिळाली. मतदान कमी झाले तरी शिवसेनेचा मतांचा टक्का कमी झाला आहे.
उमेदवार मिळालेली मते
प्रदीप साळवी : 10 हजार 7 मतदान
ऍड. दीपक पटवर्धन : 8 हजार 815
मिलिंद कीर : 8 हजार 250