ओरोस ः जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून एकदा जनता दरबार घेणार आहे. जिल्ह्यातील समस्या जागच्या जागी सुटण्यासाठी प्रत्येक महिन्याला एका कॅबिनेट मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. पालकमंत्री म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर प्रथमच शासकीय दौऱ्यावर आल्यानंतर सर्व शासकीय विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हे पण वाचा – अन् मोपेडस्वार तरुणी पडली नदीत…
येथील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर व्हीआयपी दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, “”सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी कधीच आला नव्हता एवढा विकास निधी जिल्हा नियोजन व चांदा ते बांदा योजनेतून माजी पालकमंत्री आ केसरकर यांनी आणला. त्यामुळे त्यांचे मी प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. या बैठकीत अनेक कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. अनेक कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. अनेक कामे प्रशासकीय पातळीवर मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत. ही कामे त्वरित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणतेही काम निधी अभावी रखडणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.”
हे पण वाचा – रायगडावर येऊन महाराष्ट्राची माफी मागा ; कोल्हापूरात शिवप्रेमी भडकले
25/15 कामांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कामांवरील स्थगिती उठविणार आहेत. मागील सरकारने स्थगिती दिलेल्या सिंचन प्रकल्पावरील स्थगिती सुद्धा उठविली जाणार आहे. सुरु असलेले कोणतेही प्रकल्प बंद केले जाणार नाहीत, असे यावेळी सामंत यांनी सांगितले. यावेळी खा राऊत जिल्ह्यातील छोटे सिंचन प्रकल्प सुरु करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मसुरे आंगणेवाडी सिंचन प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे, असे सांगितले. तर श्री सामंत यांनी जिल्ह्यात आम्हाला सुरुवातीला 10 ते 15 कामे आदर्शवत करावयाची आहेत. या कामांचा आदर्श अन्य जिल्ह्यांनी घ्यावा, असा आमचा प्रयत्न असेल.
वाळूचे धोरण ठरलेले नाही
जिल्ह्यात विकास निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मात्र, अद्याप वाळू लिलाव झालेले नाहीत. मग कामे कशी होणार असा प्रश्न सामंत यांना विचारला असता त्यांनी अद्याप शासनाने याबाबत धोरण ठरविलेले नाही. ते लवकरच ठरेल. याच आठवड्यात महसुल मंत्री थोरात यांनी याबाबत बैठक लावली आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोस्टल भागातील रस्ते कामाला सुरुवात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकार यांच्याशी मी बोलणार आहे. आजच्या बैठकीत जून 2020 नंतर या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
“स्ट्रीट लाईट’ योजनेबाबत सूचना
स्ट्रीट लाईट पुरविणे ही योजना ग्रामपंचायत पातळीवर रखडविण्यात आली आहे. ही बाब योग्य नाही. मी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही योजना त्वरित सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कासार्डे ट्रामा केअर, युवकांसाठी व्यायामशाळा या योजना लवकरच सुरु होतील. नामकरणमुळे अडकलेले सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम लवकरच सुरु होईल. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कोणी करावी ? याबाबत स्पष्टता होत नसल्याने हा विषय रेंगाळला होता. पुढील आठ दिवसात काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“चांदा ते बांदा’मध्ये रत्नागिरीचा समावेश करू
चांदा ते बांदा योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. या योजनेत माझ्या रात्नागिरी जिल्ह्याचा समावेश व्हावा, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी यासाठी मागणी करणार आहे, असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. यावरून गेले अनेक दिवस बंद होणार अशी चर्चा असलेली चांदा ते बांदा योजना यापुढे सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सावंतवाडी सेनेतर्फे सामंतांचा सत्कार
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने आज येथे सत्कार करण्यात आला. येथील वैश्यभवन सभागृत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा सत्कार पार पडला. पालकमंत्री श्री. सामंत हे आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

News Story Feeds