हर्णै ( रत्नागिरी ) – चौरस आसाच्या काटणमधून ज्युव्हेनाईल मासे किंवा माश्यांची पिल्ले बाहेर कशी पडतात, ते मच्छीमारांना दाखवण्यासाठी येथे खास प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण हर्णै समुद्रात प्रत्यक्ष मासेमारीसाठी जाऊन देण्यात आले. चौरस आसाचा वापर सर्व ट्रॉलर मालकांनी वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
नेटफिश – एमपीईडीए संस्थेसह वाणिज्य व उद्योग मंत्रालययांच्यावतीने चौरस आसाच्या काटणचा वापर ट्रॉलिंग मासेमारीमध्ये लोकप्रिय आहे. हे करण्यासाठी ऑनबोर्ड एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम हर्णै बंदर येथे राबविण्यात आले. या वेळी बळा, मांदेलीची लहान लहान पिल्ले 30 मि. मी.च्या काटणमध्ये गोळा झाली होती. 40 मि. मी.च्या काटणमध्ये पूर्ण वाढ झालेले मोठ्या आकाराचे पापलेट, हलवा, टोके इ. मासे मिळाले. सायंकाळी 6 वाजता हर्णै बंदरावर बोट मालकांना या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली.
हेही वाचा – पार्किंगसाठी 400 झाडांना लावली आग ?
चौरस आसाचा वापर सर्व ट्रॉलर मालकांनी करणे आवश्यक आहे व त्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडून 90% अनुदान मिळत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी सकाळी हर्णै बंदर येथे मच्छीमारांना किनाऱ्यावरच संतोष कदम, राज्य समन्वयक, नेटफिश संस्था यांनी मत्स्य व्यवसायात शाश्वत मासेमारीसाठी चौरस आसाच्या काटणचे महत्व यावर मार्गदर्शन केले व चौरस आसाच्या काटणचे महत्त्व ही पुस्तिकाही वाटण्यात आली.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची येथे होणार हकालपट्टी
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दिप्ती साळवी (सहाय्यक मत्स्य व्यवसाय) विकास अधिकारी उपस्थित होत्या. त्यांनीही मार्गदर्शन केले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत समुद्रात चौरस आसाच्या काटणचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये 40 मि. मी. चौरस आसाचे काटण वापरण्यात आले. या काटणच्या वर 30 मि. मी. आसाचे डायमंड आसाचे काटण वापरले होते. या कार्यक्रमासाठी हर्णै-पाजपंढरी परिसरातील बहुसंख्य मच्छीमार बांधव उपस्थित होते.
फिशिंग पद्धतीसाठी लागणारे जाळे उपलब्ध
मासेमारीसाठी खूप उपयुक्त आणि मच्छीमारांच्या फायद्याचे प्रक्षिक्षण मिळाले. तीन तास या जाळ्याचा वापर करून मासेमारी कशा प्रकारे करायची, हे प्रतिनिधींनी दाखवले. हे जाळे मच्छीमारांसाठी फायदेशीर असले तरी या फिशिंग पद्धतीसाठी आम्हा मच्छीमारांना लागणारे जाळे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे.
– यशवंत खोपटकर; स्थानिक मच्छीमार, प्रशिक्षणार्थी

News Story Feeds