रत्नागिरी – सांगलीमध्ये शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आयोजित पहिल्या राज्यस्तरीय थ्री डी रंगावली स्पर्धेत येथील कलाशिक्षक व युवा रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सिमेंटच्या पोतळ्यांवर झोपलेल्या मुलाची 6 बाय 4 फुटांची रांगोळी त्यांनी 15 तासांत रेखाटली. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक येथील फक्त 25 स्पर्धकांची निवड होणार होती. कळंबटे यांचे नाव प्रतीक्षायादीत होते, पण शेवटच्या क्षणी निवड झाली. या संधीचे त्याने सोने केले. त्यांना प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र प्राप्त झाले.
स्व. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त स्पर्धा घेण्यात आली. मोनाली बच्छाव (नाशिक) व रमेश पांचाळ (मुंबई) यांना द्वितीय क्रमांक मिळाला. यात रत्नागिरी जिल्ह्यातून फक्त कळंबटे यांची निवड झाली. मूळचे मालगुंड गावचे कळंबटे सेंट थॉमस स्कूलमध्ये कलाशिक्षक आहेत. स्पर्धेसाठी 60 प्रवेशिका आल्या होत्या. अन्वर पट्टेकरी, रमण लोहार, सचिन अवसरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हेही वाचा – मार्लेश्वर गिरीजादेवी कल्याणविधीसाठी वऱ्हाडी मारळ नगरीत
स्पर्धेमध्ये गणपती मूर्तीकार, चूलीवर जेवण करणारी महिला, दुर्गा, आनंदीवारी, मच्छीमार, नवविवाहिता, बैलगाडी शर्यत, दळण दळणारी महिला अशा विषयांवरील रंगावली साकारल्या होत्या. आतापर्यंत ज्या कलाकारांना टीव्ही, यू ट्यूबवर पाहत होतो, त्या कलाकारांना पाहता आले. ते रांगोळ्या कशा काढतात, हे पाहता आले, असे कळंबटे यांनी सांगितले. रंगावलीच्या साऱ्या प्रवासात प्रसिद्ध रंगावलीकार राजू भातडे आणि प्रशांत राजिवले यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत असल्याबद्दल आभार मानले.
हेही वाचा – लयभारी ! श्री मार्लेश्वरवारी करणारा असाही दिव्यांग भक्त
चांगल्या कामाच्या निर्धाराचे मिळाले फळ
स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी नाही तर नामवंत कलाकारांना पाहण्यासाठी जायचे ठरवले होते. ऐन वेळी कुणी तरी आले नाही, म्हणून माझा नंबर लागला. पण अचानक तयारी कशी करायची, हा प्रश्न होता. स्पर्धेत आपले काम चांगले करायचे, हा निर्धार केला होता. एवढ्या सर्व मोठ्या कलाकारांमध्ये क्रमांक मिळेल, याची अपेक्षा नव्हती आणि त्या निर्धाराचे फळ मिळाल्याचे कळंबटे म्हणाले.

News Story Feeds