कणकवली (सिंधुदूर्ग) : येथील नगरपंचायतीच्या कचरा टेंडर प्रक्रियेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. नगरपंचायतीची स्थायी समिती, तत्कालीन मुख्याधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप नगरपंचायतीमधील विरोधी पक्ष नगरसेवकांनी केला. 900 कोटींच्या कचरा प्रकल्पाची घोषणा केली गेली; पण या प्रकल्पाचाही पत्ता नसल्याची टीका नगरसेवकांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात स्वीकृत नगरसेवक कन्हैया पारकर, भाजपचे नगरसेवक रूपेश नार्वेकर आणि शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायतीच्या कारभारावर टीका केली. यावेळी योगेश मुंज, सुजित जाधव आणि शेखर राणे उपस्थित होते. पारकर म्हणाले, ‘शहरातील कचरा संकलनासाठी नगरपंचायतीने निविदा प्रक्रिया केली. पहिल्या निविदेत तीन तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला;
मात्र कागदपत्रांची पूर्तता नसल्याने ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली. दुसऱ्या टेंडर प्रक्रियेत एकाच ठेकेदाराने सहभाग घेतला; मात्र या ठेकेदाराने तब्बल 52 लाख रुपये जादा दराची निविदा सादर केली. ही निविदा मंजूर करून तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगरपंचायतीच्या स्थायी समितीने या वाढीव रकमेच्या निविदेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. जिरगे यांच्याकडे पाठवला. जिल्हा प्रशासनानेदेखील डोळेझाक करून या निविदेला मंजुरी दिली.”
लाखाने रुपये तरीही काम नाही
पारकर म्हणाले, “नगरपंचायतीची यापूर्वीची कचरा संकलन निविदा 1 कोटी 17 लाख रुपयांची होती, तर मंजूर झालेली निविदा 1 कोटी 69 लाख रुपयांची आहे. म्हणजेच पूर्वीच्या टेंडरपेक्षा नवीन निविदेनुसार 52 लाख रुपये ठेकेदाराला जादा अदा केले आहेत. कचरा संकलनासाठी एवढी जादा रक्कम मोजूनही ठेकेदाराने कर्मचारी वाढविलेले नाहीत की, कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविलेले नाही. कचरा संकलनासाठी वाहनेदेखील तेवढीच आहेत. एवढी जादा रक्कम मोजूनही शहरात कचऱ्याची समस्या कायम आहे.”
हेही वाचा– छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना भेट दयायची आहे मग हे वाचा….
कंपनीचा डल्ला
कणकवलीत मोठा गाजावाजा करून 900 कोटींचा कचरा प्रकल्प आणणार, अशी घोषणा आमदार नीतेश राणे यांनी केली होती; पण कचरा प्रकल्पाचा अजून पत्ताच नाही. उलट कचरा प्रक्रिया करणाऱ्या कंपनीने नगरपंचायतीच्या कचरा डेपोवर कब्जा केला आहे. तब्बल 10 लाख 13 हजार रुपयांचे नगरपंचायतीचे जागेचे भाडेदेखील थकविले आहे. या कंपनीला नगरपंचायत गेली 7 महिने नोटिसा पाठवतेय; पण अजून एकाही नोटिशीचे उत्तर या कंपनीकडून आलेले नाही, असा आरोप कन्हैया पारकर यांनी केला.
हेही वाचा- व्हाॅट्सअप वर मकर संक्रातीच्या शुभेच्छांचा नुसता धुरळा….
उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट
नार्वेकर म्हणाले, “नगरपंचायत पर्यटन महोत्सवासाठी नगरपंचायतीचा एकही रुपया घेतला जाणार नाही, अशी ग्वाही नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिली होती. जर एकाच कचरा टेंडरमध्ये 52 लाख रुपयांचा भ्रष्टाचार होत असेल तर पर्यटन महोत्सवासाठी नगरपंचायतीचा पैसा हवाच कशाला? एवढ्या रकमेत चार पर्यटन महोत्सव होतील.” संपूर्ण कणकवलीकरांकडून मालमत्ता व इतर करातून दरवर्षी 75 ते 76 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, तर केवळ कचरा संकलनासाठी नगरपंचायत 1 कोटी 69 लाख रुपयांचा खर्च करत आहे, असे पारकर आणि नार्वेकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा– सॅकमधून केला जातो हा काळा धंदा….
आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा
या प्रकरणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “”कचरा टेंडरप्रश्नी विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि प्रसिद्धीसाठी आहेत. नव्या टेंडरनुसारचे देयक अजूनही ठेकेदाराला अदा झालेले नाहीत. नव्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. कचरा संकलनासाठी वाहनांची संख्या वाढवण्यात आलेली आहे; मात्र याबाबतची कुठलीही माहिती न घेता विरोधकांनी आरोप केले आहेत. त्याबाबत नगरपंचायतीची बाजू उद्या (ता. 15) आमचे नगरसेवक मांडतील.”

News Story Feeds