ओरोस ( सिंधुदुर्ग ) – कुडोपी येथे आढळून आलेली कातळशिल्पे सुमारे 10 एकर जागेत विस्तारलेली आहेत. सुमारे 85 प्रकारची ही चित्रे आहेत. येथे मानवी वापराची जुनी दगडी हत्यारे मिळाली आहेत. या सर्वांचे अस्तित्व सुमारे इ. स. 10 हजार वर्षापूर्वीपासून असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. या ठिकाणी हेरिटेज पर्यटन केंद्र उभे राहु शकते; मात्र या कातळ शिल्पांचे संरक्षण करणे प्राथमिक गरज आहे. त्यामुळे ही शिल्पे संरक्षित करण्यासाठी पहिले पाऊल उचलले जाणार आहे. या करिता राज्य पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.
याबाबत जिल्हा परिषदमध्ये राज्य पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी पराडकर यांची बैठक झाली. यात कुडोपी येथील कातळशिल्पे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यावर चर्चा प्रामुख्याने झाली. यावेळी कातळशिल्पे पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यावर दाखल होणाऱ्या पर्यटकांकडून त्याला बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे प्रथम ही शिल्पे संरक्षित करण्याचा मुद्दा आला. त्यानुसार कोकण ग्रामीण पर्यटन योजनेतून यासाठी निधी उपलब्ध होईल का ? यावरही चर्चा झाली. त्यानुसार नियोजन करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा – शरद पवार म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढा
मालवण तालुक्यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळूण आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाश झोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्टया प्रसिद्धीस यावीत, याकरिता कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळशिल्प ठिकाणी 1 जानेवारीला आयोजित केली होती. यावेळी पंचायत समिती सभेत त्यादृष्टीने नियोजन करण्याचे ठरले.
हेही वाचा – अरे बापरे ! यंदा काजू उत्पादनही घटणार
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात महत्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्प आढळून आली आहेत. मालवण तालुक्यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कातळशिल्पे वैविध्यपूर्ण असून तिला इसवी सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक महत्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची आहेत ? त्यातून काय व्यक्त होते ? हे सांगणे कठीण आहे. साधारपणे इसवी सन पूर्व 10 हजार वर्षापूर्वी पासूनची असल्याचा अंदाज आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी पराडकर यांनी सांगितले. त्याच बरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचविली जावी, यासाठी स्थानिक बचत गटाच्या सदस्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे, असेही यावेळी पराडकर यांनी सांगितले.
प्रचार – प्रसिद्धीस प्रारंभ
या कातळ शिल्पांना प्रचार व प्रसिद्धी झाली पाहिजे. यासाठी मालवण पंचायत समितीने पाऊले उचलली आहेत. तसे नियोजन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 17 पासून सुरु होणाऱ्या मालवण पंचायत समिती महोत्सवातील स्पोर्ट टी शर्टवर या शिल्पांची छबी छापली आहे.

News Story Feeds