सावंतवाडी– कोल्हापूर येथून तस्करीसाठी आणलेल्या सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या खवले मांजरासह पाच जणांचा गुन्हा अन्वेषण विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजता अटक केली. अन्य दोघांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आंबोली बेळगाव रोडवर माडखोल सावली धाबा नजीक करण्यात आली.
या कारवाईमध्ये एक कारसह खवले मांजर पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे पण वाचा – थाटामाटात लागले `या` देवांचे लग्न
सावंतवाडीवरून कोल्हापूरला खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची टीप गुन्हा अन्वेषण विभागाला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. यासंदर्भात गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक संजय शेळके यांनी वनविभागाला कळवत सापळा रचला. वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी माडखोल सावली धाबा येथे पाळत ठेवत कोल्हापूरवरुन आलेल्या कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एकूण पाच जण होते. कारची तपासणी केली असतात मागच्या डिकीत खवले मांजर आढळून आले. याप्रकरणी गाडीमध्ये असलेल्या पाचही जणांना अटक करण्यात आली.
हे पण वाचा – शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्स दया नाहीतर…..
संतोष गेणू चव्हाण (37 रा. मालवण), उमेश बाळा मेस्त्री (65 रा. बांदा), सुनिल चंद्रकांत कडवेकर (21 रा. कोल्हापूर), विकास प्रकाश चव्हाण (35 रा.वारगाव), उदय श्रीकृष्ण शेटे (49 रा.लांजा), अशी पाच जणांची नावे असून पप्पू उर्फ मधुकर वसंत राऊळ (रा.माडखोल ) व अमोल उर्फ गजानन अर्जुन सावंत (रा.देवसू) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पाजही जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपवनसंक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.

News Story Feeds