राजापूर ( रत्नागिरी ) – तालुक्यातील शेजवली येथे लाकडाच्या माचाखाली दडून बसलेल्या बिबट्याच्या सुमारे सहा महिन्यांच्या दोन पिल्लांना सुरक्षितपणे पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये शेजवली – कोंड्ये भागामध्ये बिबट्या किंवा त्याच्या पिल्लांना जेरबंद वा आढळण्याची चौथी घटना आहे.
तालुक्यातील शेजवली येथील विजय गुणाजी परवडे यांच्या घरामध्ये सायंकाळच्यावेळी दोन बिबट्याची पिल्ले घुसली. घरातील माणसांसह शेजाऱ्यांनी आरडाओरड केली असता घाबरून बिथरलेल्या या पिल्लांनी घरातून धूम ठोकली. अन् नजीकच्या प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यामध्ये असलेल्या लाकडाच्या माचाखाली लपून बसली.
हेही वाचा – जिजामाता मालिकेत या आहेत गोदावरीबाई
दरम्यान, बिबट्याच्या पिल्लांबाबतची माहिती शेजवलीचे उपसरपंच मंदार राणे यांनी वनविभागाला दिल्यावर राजापूरचे वनपाल एस. व्ही. घाटगे, वनरक्षक संजय रणधीर, सहाय्यक विजय म्हादये, दीपक म्हादये, दीपक चव्हाण आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. लाकडाच्या माचाखाली दडून बसलेल्या पिल्लांना पिंजऱ्यामध्ये वनविभागाने जेरबंद केले. त्यासाठी त्यांना उपसरपंच राणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र देवळेकर, सुरेश परवडे, रामचंद्र देवळेकर, विकास परवडे, प्रथमेश परवडे आदींनी सहकार्य केले.
हेही वाचा – राजापूर तालुक्यात या गावांच्या मे मध्ये निवडणूका
पिल्लांना जुन्नर येथे पाठविणार
गत महिन्यामध्ये कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे शेजवली येथे कळकीच्या बेटावर चढलेल्या बिबट्याच्या पिल्लाची वनविभागाने सुटका केली होती. त्यावेळी सुटका केलेल्या पिल्लासह अन्य एक पिल्लू गुरुवारी (ता. 16) केलेल्या कारवाईमध्ये सापडले. याला राजापूरचे वनअधिकारी एस. व्ही. घाटगे यांनी दुजोरा दिला. या पिल्लांचे भविष्यामध्ये योग्य पद्धतीने संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी जुन्नर, पुणे येथे पाठविण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

News Story Feeds