रत्नागिरी – जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दापोलीत पारा 9 अंशापर्यंत खाली घसरला होता; मात्र पुन्हा वातावरणात झालेल्या बदलांमुळे गुलाबी थंडी गायब झाली. बुधवारपासून (ता. 15) पारा 12 ते 14 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे आंबा बागायतदारांना सुगीचे दिवस अपेक्षित आहेत.
यंदा पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. पाऊस गेला तरीही थंडी नव्हती. जानेवारीच्या पहिल्याच दिवसांपासून थंडीला सुरवात झाली. थंडी नसल्याने आंबा बागायतदार निराश झाले होते. जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवी नसलेल्या झाडांचे प्रमाण 15 ते 20 टक्के होते; परंतु अवेळी पावसामुळे त्या झाडांनाही पालवी आली.
काही ठिकाणी मोहोर आला तरी ते प्रमाण अवघे 10 टक्केच होते. 1 ते 5 जानेवारीपर्यंत हलकी थंडी होती; मात्र पुन्हा वातावरणात बदल झाले आणि पारा 23 अंशावर आला. अधूनमधून थंडी जाणवत होती. पण ढगाळ वातावरणही होते. बुधवारी सकाळपासून हवेत गारवा होता. सायंकाळी रत्नागिरीत पारा घसरु लागला. गुरुवारी पारा 14 अंशापर्यंत खाली आला. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत पारा 12 अंशापर्यंत आहे. त्यामुळे थंडी चांगलीच जाणवत होती. कपाटात गेलेली स्वेटर बाहेर पडली तर रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या होत्या.
थंडीमुळे पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. शिवाय कोवळ्या पालवीलादेखील अंकुर येण्याची शक्यता आहे. गतवर्षी जानेवारीत 30 ते 40 टक्के मोहोर होता. यावर्षी जेमतेम 10 टक्के आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बाजारात आला होता. यावर्षी मात्र आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता असून, गुढीपाडव्याचा मुहूर्त यावर्षी शेतकऱ्यांना साधणे अशक्य आहे. हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.
गुढीपाडव्याचा मुहूर्त टळणार
पौष महिना सुरू झाला असून, पौषमध्ये फळधारणा कमी होते, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचे सातत्य कायम राहून मोहोर प्रक्रिया सुरू झाली तर फळधारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

News Story Feeds