वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) – मोटरसायकल-ट्रॅक्टरमध्ये झालेल्या धडकेत येथील नगरपरिषदेच्या वाहन चालकाचा मृत्यू झाला. देवेंद्र ऊर्फ बंड्या रामचंद्र आरेकर (वय 58, रा. कॅम्प) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (ता.18) रात्री उशिरा घडली.
बंड्या आरेकर हे गेली कित्येक वर्षे नगरपरिषदेच्या वाहनांवर चालक म्हणून कार्यरत होते. काल ते रात्री 7.30 च्या सुमारास कॅम्प-म्हाडा मार्ग येथून महोत्सवाच्या दिशेने जात असताना नगरपरिषद मॉल इमारतीच्या परिसरात त्यांच्या मोटरसायकल व ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. या अपघातात आरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना गोवा-बांबुळी येथे नेत असताना वाटतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, बहिण, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. येथील नगरपरिषदेचे वाहन चालक गौरव आरेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा – सिंधुदुर्गनगरी सुंदरी ही ठरली
महोत्सवावर दुःखाचे सावट
18 जानेवारीपासून येथील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी हे या महोत्सवात गुंतले असतानाच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाल्याने या महोत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे.
हेही वाचा – चांदा ते बांदा योजना सुरू ठेवण्याची शिवसेनेची मागणी

News Story Feeds