सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) – चांदा ते बांदा योजना सरकारने गुंडाळल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच महिला बचतगटांना बसणार आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत पुन्हा विचार व्हावा, याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ व जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्याजवळ केली.
तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जाऊन सामंत व राऊत यांची दोघांची भेट घेतली. याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले आहे. ही योजना बंद करण्यात येणार नाही. याबाबत विचार केला जाईल, असा शब्दही मंत्री सामंत यांनी शिष्टमंडळाला दिला. युती शासनाच्या काळात चांदा ते बांदा योजना चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यान्वित केली होती. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला बचत गट शेतकऱ्यांनी विविध योजनेअंतर्गत आहेत.
हेही वाचा – सिंधुदुर्गनगरी सुंदरी ही ठरली
रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊल टाकले होते. यासाठी अनेकांनी स्वतःचे पैसे खर्च करून व्यवसायही उभारला होता; मात्र अचानक महाविकास आघाडीच्यावतीने ही योजना बंद करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम नियोजन विभागाच्या उपसचिव आणि पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर नव्याने वर्कऑर्डर या योजनेतील कोणत्याही कामाला मिळणार नाही तसेच प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना कार्यारंभची पत्र देऊ नयेत, असे आदेशही त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे या योजनेत पैसे गुंतवलेल्या शेतकरी तसेच महिला बचतगट अडचणीत आले आहेत.
हेही वाचा – मोपा विमानतळाचा मार्ग मोकळा
शेतकऱ्यांवर झालेला अन्याय लक्षात घेता येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख राऊळ, जिल्हा परिषद सदस्य डिसोजा, चंद्रकांत कासार तेंडुलकर, महेश शिरोडकर, सचिन कदम, विक्रांत नेवगी आदींच्या शिष्टमंडळाने मंत्री सामंत व खासदार राऊत यांची मुंबईत भेट घेतली व याबाबत चर्चा केली. योजना पूर्णतः बंद झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये पैसे गुंतवणे त्यांच्या मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी ही योजना बंद करण्याबाबत आपणाला शब्द दिला असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. ही योजना सुरू राहण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, असा शब्दही यावेळी श्री. सामंत यांनी शिष्टमंडळाला दिला.
तिलारीचे पाणी मळगाव, वेत्ये, तसेच नेमळे गावापर्यंत देण्यात यावे, अशी मागणीही श्री. राऊळ यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यावर विकासकामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे अन्याय केला जाणार नसून विकास कामात जिल्हा आघाडीवर असेल असे सांगितले.

News Story Feeds