रत्नागिरी : नारळातून काढल्या जाणाऱ्या निरेचा साखरनिर्मितीसाठी उपयोग केला जातो. याचा पहिला प्रयोग केरळमध्ये झाला. आता रत्नागिरीतील भाट्ये नारळ संशोधन केंद्रात हा प्रयोग यशस्वी केला आहे. मधुमेही रुग्णांकरिता ही साखर उपयुक्त असून भविष्यात त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.
निरा हे पेय म्हणून कोकणात ओळखले जाते. त्यापासून माडी बनविली जाते. निरेमध्ये केवळ १४ ते १८ टक्के साखर असते. उसापासून तयार केलेल्या साखरेत ग्लाईसेमिक निर्देशांक ६५ असतो; मात्र निरेपासून बनविलेल्या साखरेत ग्लाईसेमिक निर्देशांक ३५ एवढा कमी असल्यामुळे ती मधुमेही व्यक्तींसाठी आरोग्यदायी मानली जाते. नारळाच्या पुष्पसंभारातून
हेही वाचा– तर एनआरसी कायदा शाहूंनी फाडला असता
सूर्योदयापूर्वी जो रस येतो त्याला निरा म्हणतात. त्यापासून साखर, मध तयार केला जातो. नारळाची लागवड कोकणात होते. त्यामुळे निरेपासून साखरेचे उत्पादन फायदेशीर ठरू शकते. भारतात मधुमेहींचे प्रमाण अधिक आहे. गोड खायचे असेल तर निरेपासून तयार केलेली मिठाई, गोड पदार्थ हे मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहेत.
निरेपासून साखर अशी बनवावी
निरेपासून साखर बनविण्याची प्रक्रिया सोपी आहे. २० ते २५ वर्षे असलेल्या नारळाच्या झाडापासून दीड ते दोन लिटर निरा मिळते.सूर्योदयापूर्वी काढलेली ही निरा आरोग्यदायी आहे. ती स्टीलच्या भांड्यात घेऊन गॅसवर घट्ट होईपर्यंत तापवायची. थंड केल्यावर त्याचा एक खडा तयार होतो. तो मिक्सरमध्ये बारीक केला की त्याची साखर बनते. उसाच्या साखरेचा रंग पांढरा असतो तर या साखरेचा रंग तांबूस असतो. रत्नागिरीतील भाट्ये नारळ संशोधन केंद्रात ही साखर बनवण्यात आली आहे.
निरा अशी काढली जाते
निरानारळाच्या पुष्पसंभाराला म्हणजे पोईला दोरीने घट्ट बांधायचे. त्या पोईचा समोरचा भाग कोयतीने कापायचा आणि त्यानंतर निरा संकलन करण्यासाठी तयार केलेले भांडे पुढे लावायचे. ती निरा दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी काढायची असते. सूर्योदयानंतर निरा काढल्यास तिचे गुणधर्म बदलतात व त्याला ताडी किंवा माडी म्हणतात.
डायबेटिसच्या रुग्णांसाठी साखर उपयुक्त
रत्नागिरीतल्या भाट्ये नारळ संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर हा प्रयोग स्वत: केला आणि साखर तयार झाली. ती अनेक लोकांना दाखवली, त्यांना ती आवडली. डायबेटिसच्या रुग्णांकडून मागणीही आली. महिन्याला शंभर किलो साखरेची विक्री होते. एक लाख रुपयांच्या व्यवसायात ३० ते ४० हजार रुपये नफा होतो. हा प्रयोग केरळमध्ये झाला.
– तुषार आग्रे, व्यावसायिक
भविष्यात नीरा साखरेला मागणी वाढेल
गोड खायचे असेल तर नारळच्या निरेपासून बनविण्यात येणारी साखर मधुमेहींसाठी उपयुक्त ठरू शकते. याला भविष्यात मागणी वाढेल.
– डॉ. वैभव शिंदे, विद्यावेत्ता, कोकण कृषी विद्यापीठ

News Story Feeds
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I like the valuable information you provide in your articles.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.