लांजा ( रत्नागिरी ) – कोकणाला विकास कामात खऱ्या अर्थाने झुकते माप शिवसेनेनेच दिले आहे. गेले अनेक वर्षांची गोळवशी – वडद – हसोळ ग्रामस्थांची मागणी शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागली आहे. मुचकुंदी नदीवरील हा पूल दोन गावांनाच जोडणारा नसून दोन गावातील ग्रामस्थांची मने जोडणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गोळवशी येथे केले.
लांजा तालुक्यातील गोळवशी – वडद – हसोळ दरम्यानच्या मुचकुंदी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री. सामंत बोलत होते. यावेळी विलास चाळके, लीला घडशी, दीपाली दळवी – साळवी, पूजा आंबोळकर, तहसीलदार पाटील, यशवंत भांड, विनोद सावंत, प्रकाश गुरव, गोळवशी सरपंच अशोक गुरव उपस्थित होते.
हेही वाचा – मुंबई – गोवा महामार्गावरील 85 वर्षापूर्वीचा हा पुल झाला इतिहास जमा
सामंत म्हणाले, मंत्री झाल्यावर हे पहिलेच भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे. त्याचा मला आनंद आहे. येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आता मार्गी लागत आहे. त्यामुळे नावावरून वाद निर्माण करू नका. काही तांत्रिक कारणांमुळे नामफलकावरील नावात चूक झाली असली तरी येत्या 24 तासात झालेली चूक सुधारली जाईल. हा शब्द याठिकाणी आज मी देत आहे. तशा सूचना आजच मी संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे. हा पूल तर होईलच परंतु या पुलाच्या पुढील रस्ता देखील होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुढच्या रस्त्याची हमी देतो. शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी या दोघांचे हात बळकट करण्याचे आवाहनही त्यानी केले.
हेही वाचा – सिंधुदुर्गनगरी सुंदरी ही ठरली
खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, गाव हे विकासाचे केंद्रबिंदु मानून काम केले की, गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही. गोळवशी गावाने ते दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे या गावाच्या विकासासाठी कधीही निधी पडू देणार नाही. या गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहोत. याप्रसंगी आमदार राजन साळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
नामफलकावरील नावावरून ग्रामस्थांची नाराजी
मूचकुंदी नदीवर होणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नामफलकावर केवळ गोळवशी गावाच्या नावाचाच उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे वडद – हसोळ गावातील ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले आहेत. या कार्यक्रमात अलिप्त बसत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र सामंत व राऊत यांनी त्यांची समजूत काढली.

News Story Feeds