रत्नागिरी – येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजित स्ट्रॉंग वुमन पॉवरलिफ्टिंग आणि भंडारी श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत मानाची चांदीची गदा पटकावत मिनार वायंगणकरने भंडारी श्री 2020 चा किताब पटकावला. खुल्या गटात शाश्वत मानकर भंडारी श्रीचा मानकरी बनला असून अनुजा सावंत रत्नागिरी जिल्ह्याची स्ट्रॉंग वुमन ठरली.
स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भैरी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांच्या हस्ते झाले. भंडारी श्रीमान होण्याचा मान भाई विलणकर यांनी मिळवत सुवर्णपदक, चषक व रोख रक्कम, तर संदेश चव्हाण यांनी रौप्यपदक, प्रमोद नाखरेकर यांनी कास्यपदक मिळविले.
हेही वाचा – काय आहे कापडी पिशव्यांचा दोडामार्ग पॅटर्न ?
खुल्या गटात घेण्यात आलेल्या भंडारी मसल मेनियाचा विजेता चिपळूणचा आकाश मोहन पाटील ठरला. भंडारी श्री खुल्या गटामध्ये शाश्वत शंकर मानकर भंडारी श्रीचे विजेते बनले. भंडारी श्री 2020 चा मानकरी मिनार वायांगणकरने चांदीची गदा, सुवर्णपदक, रोख रक्कम मिळवण्याचा मान पटकावला.
रत्नागिरी फिटनेस स्टुडियोच्या रोहन शिरधनकरने उपविजेतेपद पटकावले. बेस्ट पोजरचा बहुमान चिपळूणच्या समीर मोरेने, तर भंडारी श्री उगवता तारा सीलायन फिटनेस नाटेच्या सिकंदर कनगुटकरने पटकावला. सुमारे 10 वर्षांनी केवळ महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनुजा सावंत हिने रत्नागिरी जिल्ह्याची स्ट्रॉंग वुमन होण्याचा बहुमान मिळवला.
हेही वाचा – नामफलकावर विसरले गावाचे नाव, यावर मंत्री उदय सामंत म्हणाले…
मिस इंडिया हर्षदाचे पोजिंग
या स्पर्धेचे खास आकर्षण मिस इंडिया हर्षदा पवार ही होती. उपस्थित प्रेक्षकांसाठी तिने शो पोजिंग करून दाखवले. तिने दिलेल्या पोजिंगला प्रेक्षकांनीही दाद दिली. चिपळूणची तन्मयी देसाई हिने डांसिंग शो पोजिंगचे प्रदर्शन केले.

News Story Feeds