रत्नागिरी – नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील दोन्ही पेपरमध्येच चुका असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे परीक्षार्थी गोंधळून गेले असून निकालावेळी सदोष प्रश्न रद्द केले जाणार की लाखो उमेदवारांना हक्काचे गुण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील विविध केंद्रांवर रविवारी (ता. 19) दोन पेपर घेण्यात आले. सकाळी 10.30 ते दुपारी 1 या कालावधीत पेपर क्रमांक 1, तर दुपारी 2 ते 4.30 या कालावधीत पेपर क्रमांक 2 होता. त्यात पेपर क्रमांक 1 मध्ये दोन-तीन ठिकाणी चुकीचे प्रश्न होते. काही ठिकाणी चुकीचे पर्याय होते. काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील तर पेपर क्रमांक दोनमध्ये प्रश्नांना पर्यायच नव्हते. काहीत प्रिंटिंगच्या चुका होत्या. शब्दाचा अर्थ बदलल्यामुळे पूर्ण प्रश्नच बदलत होता. या प्रकारामुळे परीक्षार्थी गोंधळून गेल्याच्या तक्रारी पर्यवेक्षकांकडे केल्या. याबाबत परीक्षा परिषदेकडे तक्रार करावी, असे केंद्रप्रमुखांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – भंडारी श्री अन् स्ट्राॅग वुमनचे हे मानकरी
अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, प्रिटिंगच्या आणि शुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका यामुळे सुमारे 3 लाख 43 हजार 364 परीक्षार्थी संभ्रमात पडले आहेत. विविध तक्रारीनंतर जे प्रश्न संबंधित यंत्रणेला चुकीचे वाटतात ते रद्द केले जातात. सोपे-सोपे प्रश्न प्रिंटिंगच्या चुकांमुळे रद्द केले जाण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात घडत आहेत. याचा फटका अनेक परीक्षार्थींना बसतो. त्यामुळे रद्द झालेले प्रश्न अनेकांच्या निकालावर परिणाम करत आहेत.
हेही वाचा – नाईट लाईफबाबत मंत्री अनिल परब म्हणाले,
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पास झाल्यानंतर शिक्षक भरतीच्या टीएआयटी (अभियोग्यता) परीक्षेला बसता येते. डिसेंबर 2017 पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया राज्यभरात सुरू आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेला बसण्याचा उत्साह डीएड्, बीएड् धारकांतून दिसून आला. टीईटी पात्र नसलेल्या परंतु सेवेत असलेल्या राज्यातील 8 हजार शिक्षकांना सेवा समाप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा झालेली नव्हती. त्यातच शिक्षक भरतीचे गाजर दाखवण्यात येत असल्यामुळे डी. एड्. व बी. एड्. झालेल्या उमेदवारांनी यंदा मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
टीईटी परीक्षा महत्त्वाची मानली जाते; मात्र या परीक्षेत अनेक त्रुटी होत्या. याचा फटका परीक्षा देणाऱ्यांना बसणार आहे. पेपरमधील चुकांमुळे संबंधित यंत्रणेने प्रश्न रद्द न करता चुकीच्या प्रश्नांना सरसकट गुण द्यावेत.
– भालचंद्र दुर्गवळी, परीक्षार्थी

News Story Feeds