वैभववाडी (सिंधूदूर्ग) : सततच्या ढगाळ वातावरणांमुळे काजू पिकांवर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अगोदरच ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगामुळे हैराण झालेले काजू बागायतदार फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे अक्षरक्ष: मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे एकीकडे काजू हंगाम लांबणीवर पडला असून दुसरीकडे काजू उत्पादनात 50 टक्केने घट होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर लांबलेला पाऊस आणि वादळाचा विपरित परिणाम काजूबागांवर झाला. काजूला ढेकण्या, शेंडेमर, फांदीमरचा विळखा बसला. या रोगांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या बागा नष्ट झाल्या. त्यातुनही काही शेतकऱ्यांनी जीवाचे रान करीत अथक परिश्रमाने बागा वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले; परंतु काजूंना ऑक्टोबर महिन्यात येणारी पालवी नोव्हेंबर संपला तरी आली नाही. डिसेंबरपासून काजूंना चांगली पालवी आली.
हेही वाचा– वाढदिवसाला कापला चक्क ३७ किलोचा केक….
ढगाळ वातावरणामुऴे मोहोर काळवंडला
अनेक काजू बागा मोहोरल्या देखील आहेत. गेले महिनाभर अधुनमधुन ढगाळ वातावरणाची मालिका सुरू आहे. या वातावरणामुळे काजुवर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काजुचा मोहोर काळवंडला असुन तयार होत असलेल्या काजु काळ्या पडु लागल्या आहेत. सातत्याने फवारण्या न परवडणाऱ्या असल्यामुळे या रोगामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे काजु उत्पादन 50 टक्केने घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा– काय आहे कापडी पिशव्यांचा दोडामार्ग पॅटर्न ?
काजु आला धोक्यात
काजु हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थीक कणा मानला जातो. आंबा पीकास पोषक नसलेल्या जिल्ह्याच्या पुर्वपट्टयात काजु लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी काजुतून आर्थीक उन्नती साधली आहे. काजू उत्पादनातून जिल्ह्यात बाराशे ते पंधराशे कोटीची उलाढाल होते; परंतु यावर्षीचा काजू हंगाम बागांवर सातत्याने होत असलेल्या विविध कीडरोगाच्या अतिक्रमणामुळे धोक्यात आला आहे.

News Story Feeds