चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलताना अडचण येते. कधी समजतानाही अडचण येते. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. मात्र, येथील सहजीवन शिक्षण संस्थेने यावर मात करण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. इंग्लिश लॅंग्वेज लॅब व डिजिटल क्लासरूम उद्यापासून सुरू होत आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात इंग्रजी भाषेत संवाद होईल. यावेळी विद्यार्थ्याची चूक झाली तर त्यांची दुरुस्ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तत्काळ होईल. यामुळे बोलण्याचा सराव होईल व बोलणे बिनचूक होईल. इंग्लिश विषयाची लेक्चर्स विद्यार्थ्यांना व्हॉटसॲपव्दारे उपलब्ध होणार आहेत.
येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालयात अद्ययावत इंग्लिश लॅंग्वेज लॅब व डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात येत असून त्याचे उदघाटन उद्या (ता. २१) सकाळी ११ वाजता होणार आहे. सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हिराचंद प. बुटाला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आय.सी.एस. महाविद्यालयाच्या हिराचंद प. बुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संकुलात कार्यक्रम होईल. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश लॅंग्वेज लॅब व डिजिटल क्लासरुम अतिशय माफक शुल्कात उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा– तिच्या हाती सोळा जनावरांची दावी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार
त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार मिळू शकेल. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये इंग्रजी भाषेत प्रत्यक्ष संवाद होऊन इंग्रजी बोलताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांची दुरुस्ती प्रत्यक्ष व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे होईल. एका बॅचची प्रवेश क्षमता ३० विद्यार्थी एवढी आहे. हा अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन विभागाचे समन्वयक प्रा. सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकशास्त्र विभागाच्या प्रा. सजेली बुटाला यांच्या नियंत्रणात सुरू रहाणार आहे. उपक्रम सुरू करण्यासाठी सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद प. बुटाला, उपाध्यक्ष नंदकुमार द. गुजराथी, सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला, आय.सी.एस.महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग व प्राध्यापकांनी सहकार्य केले.
हेही वाचा– काजूवर घातला याने घाला
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम
हा अभ्यासक्रम ऑक्सफर्ड युर्निव्हर्सिटीने निश्चित केला आहे. तसेच इंग्लिश विषयाची लेक्चर्स विद्यार्थ्यांना व्हॉटस्ॲपव्दारे उपलब्ध होतील. डिजिटल क्लासरूमच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना जगभरातील तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधता येईल. शिक्षक एकाच वेळी वर्गातील दोन किवा अधिक विद्यार्थ्यांशी दोन वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधू शकतात. या अभ्यासक्रमासाठी वर्गखोलीत डिजिटल एलसीडी प्रोजेक्टर, टचस्क्रीन बोर्ड अशी स्वतंत्र डिजिटल यंत्रणा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बसवली आहे.

News Story Feeds