सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या निमित्ताने आज नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेऴी सिंधुदुर्गातील नाईक आणि राणे कुटुंबातील वाद आज पुन्हा उफाळून आला. खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा पडला.
दरम्यान, केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरुन नियोजन सभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला.नितेश राणे आणि वैभव नाईक हे भरसभेतच एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र नारायण राणे आणि उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणावर पडदा टाकला.. दीपक केसरकरांचा अभिनंदन ठराव वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडल्याने वादाला तोंड फुटलं.
हेही वाचा– इंग्रजी खुलणार विद्यार्थी-शिक्षकांच्या सहजीवनातून
राणे आणि नाईक यांच्यात बाचाबाची
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची झाली.आमदार वैभव नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसंच पालकमंत्री उदय सामंत यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरवाला अनुमोदन दिलं. शिवसेना नेते दीपक केसरकर पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी सिंधुदुर्गात आला.
हेही वाचा– आयुष्यामध्ये बदल घडतोच ; कसा तो वाचाच
विकासाच्या राजकारणाचा मुद्दा
त्यामुळे केसरकरांचं अभिनंदन करावं, असा ठरावही वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडला.नितेश राणे-वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची, राणे-उदय सामंतांची मध्यस्थी सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणेंनी दीपक केसरकर यांना टार्गेट केलं. केसरकरांनी गेल्या पाच वर्षात विकासाचं राजकारण केल्याचा आरोप राणेंनी केला.

News Story Feeds