गुहागर ( रत्नागिरी ) – ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपासूनच कार्यकर्त्यांनी मतदार बांधणीची सुरुवात करावी. आता गाव पॅनेल नको, भाजपपुरस्कृत गाव पॅनेलने निवडणुका लढवा, असे आवाहन डॉ. विनय नातू यानी केले. यातून भाजपचा मनसुबाही स्पष्ट केला.गुहागर भंडारी भवन येथे बाजपच्या बैठकीत ते बोलत होते.
गुहागर तालुका भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीस डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता.20) गुहागर भंडारी भवन येथे पार पडली. यावेळी नूतन तालुकाध्यक्षपदी निलेश सुर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली.
हेही वाचा – धक्कादायक ! टीईटीच्या दोन्ही पेपरमध्ये तांत्रिक चुका
गुहागर भाजप तालुकाध्यक्षपदाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नव्या तालुकाध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार होती. तत्पूर्वी गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून तालुका सरचिटणीस निलेश सुर्वे यांची निवड केली होती. आज झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुर्वे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी भाजप प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस निलम गोंधळी, वसंत गोंधळी, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिरगांवकर, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष रामदास राणे, श्रीकांत महाजन उपस्थित होते.
हेही वाचा – नाईट लाईफबाबत मंत्री अनिल परब म्हणाले,
नूतन तालुकाध्यक्ष सुर्वे यांनी, परखड शैलीत आपल्या राजकीय वाटचालीचा आढावा घेऊन माझ्यावर या पदाची दिलेली जबाबदारी मी निष्ठेने व मेहनतीने पार पाडेन असे सांगून मी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मला सहकार्य करावे, असे आवाहन केले. डॉ. विनय नातू हे माझे आराध्य दैवत असून एक चांगला नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांच्यामुळेच मी भाजप पक्षात आलो, असे उद्गार सुर्वे यांनी काढले. ज्यांनी मला राजकारणात घडविले, मार्गदर्शन केले अशांचे मनःपूर्वक आभार सुर्वे यांनी मानले. डॉ. विनय नातू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवा, त्यांची कामे करा.

News Story Feeds