चिपळूण ( रत्नागिरी ) : मुंबई – गोवा महामार्गावर टोल नाके उभारून टोल वसूल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा हा डोंगरी विकासामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे येथे टोल नको. जबरदस्तीने ते लादण्याचा प्रयत्न केल्यास टोल नाके उखडून फेकून देऊ, असा खरमरीत इशारा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे.

शौकत मुकादम यानी पत्रात म्हटले आहे की, महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी, अपघातमुक्त आणि जलद व्हावा, यासाठी मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हाती घेण्यात आले आहे. काम अद्याप पूर्ण देखील नसताना येथे टोल नाके उभारण्याचे प्रयोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कोकणासाठी पहिलाच असा मोठा प्रकल्प उभारला जात असताना लगेच त्याची वसुली करण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे. गुहागर ते विजापूर मार्गावर अशाच प्रकारे सती येथे टोल नाका उभारण्यात आला होता. मात्र, स्थानिक जनतेने त्या विरोधात तीव्र आंदोलन केले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले, याची आठवण करून त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – धक्कादायक ! टीईटीच्या दोन्ही पेपरमध्ये तांत्रिक चुका

त्यामुळे टोल लावताच येणार नाही

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकल्पावर टोल लावायचा असेल, तर त्याची प्रसिद्धी राजपत्रामध्ये करावी लागते. मात्र, मुंबई – गोवा महामार्गावर टोल लावला जाईल, असे केंद्रीय मंत्रालयाने बजेट मध्ये प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे या मार्गावर टोल लावताच येणार नाही, असे शोकत मुकादम यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – नाईट लाईफबाबत मंत्री अनिल परब म्हणाले,

News Item ID:
599-news_story-1579608425
Mobile Device Headline:
मुंबई गोवा महामार्गावर का लावता येणार नाही टोल ?
Appearance Status Tags:
Oppose To Toll On Mumbai Goa Highway Ratnagiri Marathi NewsOppose To Toll On Mumbai Goa Highway Ratnagiri Marathi News
Mobile Body:
चिपळूण ( रत्नागिरी ) : मुंबई – गोवा महामार्गावर टोल नाके उभारून टोल वसूल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा हा डोंगरी विकासामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे येथे टोल नको. जबरदस्तीने ते लादण्याचा प्रयत्न केल्यास टोल नाके उखडून फेकून देऊ, असा खरमरीत इशारा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे.

शौकत मुकादम यानी पत्रात म्हटले आहे की, महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी, अपघातमुक्त आणि जलद व्हावा, यासाठी मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हाती घेण्यात आले आहे. काम अद्याप पूर्ण देखील नसताना येथे टोल नाके उभारण्याचे प्रयोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कोकणासाठी पहिलाच असा मोठा प्रकल्प उभारला जात असताना लगेच त्याची वसुली करण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे. गुहागर ते विजापूर मार्गावर अशाच प्रकारे सती येथे टोल नाका उभारण्यात आला होता. मात्र, स्थानिक जनतेने त्या विरोधात तीव्र आंदोलन केले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले, याची आठवण करून त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – धक्कादायक ! टीईटीच्या दोन्ही पेपरमध्ये तांत्रिक चुका

त्यामुळे टोल लावताच येणार नाही

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकल्पावर टोल लावायचा असेल, तर त्याची प्रसिद्धी राजपत्रामध्ये करावी लागते. मात्र, मुंबई – गोवा महामार्गावर टोल लावला जाईल, असे केंद्रीय मंत्रालयाने बजेट मध्ये प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे या मार्गावर टोल लावताच येणार नाही, असे शोकत मुकादम यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – नाईट लाईफबाबत मंत्री अनिल परब म्हणाले,

Vertical Image:
English Headline:
Oppose To Toll On Mumbai Goa Highway Ratnagiri Marathi News
सकाळ वृत्तसेवा
Author Type:
Agency
Search Functional Tags:
महामार्ग, मुंबई, Mumbai, टोल, चिपळूण, विकास, नितीन गडकरी, Nitin Gadkari, कोकण, Konkan, आंदोलन, agitation, मंत्रालय, अनिल परब, Anil Parab
Twitter Publish:
Meta Keyword:
Toll News
Meta Description:
Oppose To Toll On Mumbai Goa Highway Ratnagiri Marathi News रत्नागिरी जिल्हा हा डोंगरी विकासामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे येथे टोल नको. जबरदस्तीने ते लादण्याचा प्रयत्न केल्यास टोल नाके उखडून फेकून देऊ, असा खरमरीत इशारा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here