राजापूर (रत्नागिरी) : अवकाळी पाऊस, क्यार वादळ आणि लष्करी अळींचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीचा तसेच या नुकसानीपासून वाचण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबात असलेल्या उदासीनतेचाही शेतकऱ्यांना फटका बसला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत भातशेतीसाठी तालुक्यातील केवळ चोवीस शेतकऱ्यांनी 8.68 हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्यांना सुमारे 3 लाख 77 हजार 779 रूपयांची नुकसानभरपाई मिळाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीला संरक्षण मिळावे, शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यामध्ये पिक संरक्षण मिळताना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करणे, कृषी क्षेत्रामध्ये गतीमान विकास व्हावा, आदी उद्दिष्टही डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहेत. या योजनेमध्ये काही ठराविक रक्कम भरून भातासह नागली पिकांचे विमा उतरविले जातात.
हेही वाचा– इंग्रजी खुलणार विद्यार्थी-शिक्षकांच्या सहजीवनातून
प्रधानमंत्री पीकविमा योजनेची माहिती घ्या
या योजनेमध्ये जोखीमस्तर सर्व पिकांसाठी सत्तर टक्के ठेवण्यात आला आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आदी निकषान्वये नुकसानीची छाननी करून विमा उतरविलेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जाते.
हेही वाचा– काजूवर घातला याने घाला
तर, फायदा शेतकऱ्यांना झाला असता..
या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याची भातपीक आणि नागली पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये तालुक्यातील केवळ 8.68 हेक्टर क्षेत्रासाठी 24 शेतकऱ्यांनी विमा उतरविले होते. अवकाळी पाऊस आणि क्यार वादळामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमे उतरविले असते तर, त्याचा फायदा शेतकऱ्यांना अधिक झाला असता.
दृष्टिक्षेपात..
विमा उतरविलेले शेतकरी : 24
क्षेत्र : 8.68 हेक्टर
मिळालेली रक्कम : 3 लाख 77 हजार
दृष्टिक्षेपातील राजापूर तालुका
एकूण भौगोलिक क्षेत्र- 1,19,917 हेक्टर
लागवडीचे क्षेत्र – 11814 हेक्टर
(खरीप- 11764 हेक्टर, रब्बी- 50 हेक्टर क्षेत्र)
भातशेतीचे झालेले नुकसान
बाधित गावे : 237
बाधित क्षेत्र :1854.52 हेक्टर
शेतकरी : 9 हजार
नुकसानीची रक्कम : 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रूपये.

News Story Feeds