वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) – पर्यटन आणि रोजगार वृध्दी व्हावी, या हेतुने वैभववाडीत 8 व 9 फेब्रुवारीला मिसळ महोत्सव आयोजित करण्यात येणार असुन 50 हुन अधिक पध्दतीच्या मिसळची चव जिल्हावासीयांना या महोत्सवात चाखता येणार असल्याची माहीती आमदार नितेश राणे यांनी येथे दिली.
आमदार राणे यांची येथील नगरपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, रोहन रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, संजय चव्हाण, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, संतोष पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा – रामदास आठवले म्हणाले, तीन चाकीपेक्षा दुचाकी सुसाट धावली असती…
आमदार राणे म्हणाले, “”वैभववाडीचे पर्यटनदृष्टया महत्व वाढावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, या दुहेरी हेतुने जिल्ह्यात प्रथमच येथे मिसळ महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान येथील सार्वजनिक रंगमंचनजीक भरविण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापुरसह विविध शहरात खमंग, चटकदार, चविष्टपणामुळे नावलौकीक मिळविलेले अनेक मिसळ व्यावसायिक या महोत्सवात आपआपले मिसळचे स्टॉल लावणार आहेत. 50 हुन अधिक पध्दतीच्या मिसळ जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. यामध्ये काही स्थानिक व्यावसायिकांना देखील संधी देण्यात येणार आहे.”
हेही वाचा – भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विसावला गोठ्यात अन्…
या महोत्सवाचे उद्घाटन 8 फेब्रुवारीला सायकांळी चार वाजता खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत होणार आहे. 8 फेब्रुवारीला सायंकाळी 4 पासुन 10 पर्यंत तर 9 फेब्रुवारीला सकाळी 10 पासुन सायंकाळी दहापर्यत मिसळचा आस्वाद घेता येणार आहे.
जैवविविधता संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
जैवविविधतेच्या मुद्दयाबाबत आमदार राणेंना विचारले असता श्री. राणे यांनी प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील जैवविविधतेचे अतिशय काटेकोरपणे सर्व्हेक्षण होणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवुन चर्चा करणार असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.

News Story Feeds