रत्नागिरी – कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले हे मनमानी करत असून त्यांनी कार्यकारिणी निवड करताना कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. त्यांना या पदावर कार्यमुक्त करावे, अशी मागणी रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी महसुलमंत्री तथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कॉंग्रसमध्ये उठलेल्या वादाला पुन्हा तोंड फुटले असून प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत रत्नागिरीचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण, प्रसाद उपळेकर, अनिरुध्द कांबळे यांच्यासह लांजा, संगमेश्वर, चिपळूण तालुकाध्यक्ष यांच्यासह राजापूर आणि रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी थोरात यांची भेट घेतली. त्यावेळी रत्नागिरीतील राजकीय घडामोडींविषयी त्यांनी चर्चा केली.
रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकारिणी निवडीत सुुरु असलेला सावळा गोंधळ त्यांच्यापुढे मांडण्यात आला. जिल्हाध्यक्ष ऍड. भोसले यांनी रत्नागिरी शहर व तालुका अध्यक्ष बदलासंदर्भात अचानक घेतलेल्या भूमिकेविषयी त्यांना माहिती देण्यात आली. चांगले काम करत असतानाही शहराध्यक्षपदाचा बदल करण्याचा निर्णय व्हॉटस्अपवरुन कळवला. पद बदलताना त्यांनी घेतलेले निर्णय अन्यायकारक आहेत, असे राकेश चव्हाण यांनी त्यांच्यापुढे मांडले. ते मनमानी कारभार करत आहेत, अशीही तक्रार करण्यात आली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मते थोरातानी ऐकुन घेतली.
कॉंग्रेसभवनच्या चावीवरुन झालेला वादही त्यांच्यापुढे मांडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. गेले काही दिवस जिल्हा कॉंग्रेसमधील गढुळ झालेले वातावरण थंडावला होते. कॉंग्रेसमधील एका गटाने प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन तक्रार केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला चालना मिळाली आहे. जिल्हाध्यक्ष बदलाची केलेल्या मागणीची दखल प्रदेशस्तरावर किती गांभिर्याने घेतली जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहराध्यक्षपदी राकेश चव्हाणच
रत्नागिरी शहराध्यक्षपदावरुन राकेश चव्हाण यांना जिल्हाध्यक्षांनी बाजूला केले होते. त्यानंतर रत्नागिरी कॉंग्रेसमध्ये मोठा गदारोळ झाला. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चव्हाण यांना कायम ठेवावे असे थोरातांनी स्पष्ट केले आहे. तसे पत्र प्रदेशस्तरावरुन जिल्हाध्यक्ष भोसले यांना मेलने पाठविण्यात आले आहे, याला राकेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.

News Story Feeds