सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) – देशातील बेरोजगारी व लोकसंख्येचे घट्ट प्रमाण लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे मंदीच्या नावाखाली भासवली जाणारी बेरोजगारी हटवणे तसेच समाजामधील विषमता दुर करणे, ही काळाची गरज आहे. यावर राज्यकर्त्यांनी प्रकर्षाने लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, राजकीय चिकित्सक कॉम्रेड डॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
येथील श्रीराम वाचन मंदिरातर्फे “अबकी बार सिर्फ रोजगार’ या विषयावर राजकीय चिकित्सक कॉ. अभ्यंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रा. प्रवीण बांदेकर, अल्ताफ खान, ऍड. संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा – विहिरीत पडला गवा अन्….
यावेळी ते म्हणाले, “”आज भारत देशामध्ये रोजगार, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या तसेच राष्ट्रहिताशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दिवसेंदिवस ग्रामीण जीवन भकास होत चालले आहे. बेरोजगारीचा भयाण प्रश्न आ वासून उभा आहे. या बेरोजगारीकडे आपण समस्या म्हणून पाहिले तर ती समस्या दिसेल; पण सध्या भारत देशामध्ये एवढी श्रमश्रंती आहे की, त्याचा वापरच केला जात नाही. त्यामुळे ही श्रमश्नंती अंमलात आणल्यास बेरोजगारीची समस्या दुर होऊ शकेल; मात्र ही समस्या या व्यवस्थेचा एक भाग आहे. या समस्येतच सर्व समस्यांचे उत्तर सापडू शकते. त्यामध्ये योग्य व्यवस्थापन केल्यास, त्यात येणारे अडथळे दुर केल्यास विकासाचं एक नवं बालक जन्माला येऊ शकतं.”
हेही वाचा – विरोधकांचे टार्गेट झालेले केसरकर पडले एकाकी
ते म्हणाले, भारत देशामध्ये तरुणांची संख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. साधारणतः 15 ते 29 वयोगटातील या देशातील लोकांच्या वयाची तुलनेने सरासरी काढली तर 29 वर्षे येते. यातच चीन देशाची 37 वर्षे आहे. विकसित देशातील लोकसंख्या विचारात घेतली तर त्यांचे आयुर्मान सरासरी 45 च्या आसपास आहे. आपली लोकसंख्या ही सन 1980 ते 2000 च्या काळात वेगाने वाढत होती. त्यावेळी लोकशाहीतील दुसरा टप्पा म्हणून या लोकसंख्येकडे पाहिले जात होते; मात्र मृत्यूदर कमी झाला व जन्मदर वाढला, अशी परिस्थिती होती. आता जन्मदर वेगाने कमी होत आहे. चीनने तर हा टप्पा केव्हाच पार केला आहे. भारतात 15 ते 30 वयोगटातील 23 टक्के लोक बेरोजगार आहेत. काही राज्यात 32 टक्केपर्यंत हे प्रमाण आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी संपूर्ण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 50 टक्के आहे. याचाच अर्थ उर्वरीत 50 टक्के लोक काम करीत नाहीत किंवा शोधतही नाहीत असा होतो. राष्ट्रद्वेष करणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रोजगाराच्या बाबतीत कमी, मध्यम,जास्त उत्पन्नाचे देश यांची सरासरी आकडेवारी काढली तर भारताच्या तुलनेत बाकीचे देश 67 टक्केच्याही पुढे आहेत. त्यात व्हिएतनाम 77 टक्केने सर्वात जास्त पुढे आहेत. भारतात स्त्रियांच्या रोजगाराचे प्रमाण 24 टक्के आहे. सध्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त उच्चशिक्षित असून सध्या त्या सुरक्षित नसल्यामुळे बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. संपूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या आकडेवारीपैकी भारतात असलेली मनुष्यश्नती 75 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात वापरात आणली गेली तरच ते खरे राष्ट्रभक्त आहेत, असे अभ्यंकर म्हणाले. बेरोजगारीमध्ये शिक्षीत वर्गाचे प्रमाण जास्त आहे. या मुलांनी लाखो रुपये खर्च करुन घेतलेले शिक्षण वाया जात आहे. शिक्षण, विकास, रोजगार या तिन्ही त्रिसुत्रींचा सांधा निखळला आहे, असेही ते म्हणाले. उदारीकरण, खाजगीकरण यामुळे ग्राहक कमी समाधानी झाले आहेत. देशातील सर्व्हिस सेंटर वाढले म्हणजे बेरोजगारी वाढली, असा समज कोणी करुन घेऊ नये. सध्या वाढत असलेली मंदी ही मागणी, उत्पादन, रोजगार, उत्पन्न याचाच परिणाम आहे. ही मंदी तेजीच्या चक्रातील मंदी नसून ती संरचनात्मक मंदी आहे म्हणून बेरोजगारीचा प्रश्न वाढत चालला आहे, असे ते म्हणाले.

News Story Feeds