बांदा ( सिंधुदुर्ग ) – भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या बांदा उपसरपंच निवडणुकीत भाजपचे हर्षद प्रकाश कामत यांनी शिवसेनेच्या उमेदवार रिया डॅनी आल्मेडा यांचा 9 विरुद्ध 5 मतांनी पराभव केला.
येथील ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. अमृतसागर यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवडणूक घेण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता शिवसेनेकडून रिया डॅनी आलमेडा यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. 11 वाजून 50 मिनिटांनी भाजपकडून हर्षद कामत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी दोन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत होती, मात्र अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंच अक्रम खान यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. आवाजी पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यामध्ये कामत यांच्या बाजूने 9 सदस्यांनी तर आलमेडा यांच्या बाजूने 5 सदस्यांनी मतदान केले. कामत यांनी 4 मतांनी विजय मिळविला.
हेही वाचा – अबकी बार सिर्फ रोजगार यावर अजित अभ्यंकर म्हणाले,
जिल्हा बॅंक संचालक प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, मकरंद तोरस्कर, अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, स्वप्नाली पवार, राजेश विरनोडकर, समीक्षा कळगुटकर, नेहा आळवे, समीक्षा सावंत, शहर अध्यक्ष राजा सावंत, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, मधू देसाई, सुधीर शिरसाट, प्रसाद वाळके, आबा धारगळकर, प्रवीण नाटेकर, सिद्धेश पावसकर उपस्थित होते.
हेही वाचा – विहिरीत पडला गवा अन्….
पदाला न्याय देणार
जनतेच्या व भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यामुळे आज उपसरपंचपदी विराजमान झालो आहे. शहराच्या सर्वांगीण व अपेक्षित विकासासाठी नेहमीच कार्यरत राहीन. पदाला न्याय देऊन काम करणार आहे, असे उपसरपंच कामत यांनी सांगितले.

News Story Feeds
Thank you great posting about essential oil. Hello Administ . cami halısı