सिंधुदुर्गनगरी – धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत घरे बांधण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना वैयक्तीक व सामुहिक स्वरुपाची असून त्याचे निकष, अटी व शर्ती जाहीर केल्या आहेत.
अशा आहेत अटी व शर्ती –
लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, कुटुंबाच्या स्वतःच्या मालकीचे घर नसावे, लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल, लाभार्थी वर्षातील सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव्यास असावा, या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणारा भूखंड व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल; मात्र विधवा, परितक्त्या स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील, मिळालेला भूखंड व त्यावरील घर कुटुंबास कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही, विकता येणार नाही, भूखंडावरील जागेचा वापर भाटे तत्वावर अन्य व्यक्ती, कुटुंबास देता येणार नाही, पोट भाडेकरू ही ठेवता येणार नाही, तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करण्यात येईल व मंजूर केलेल्या निधीची वसूली केली जाईल, घराचे बांधकामानंतर ग्रामपंचायतीकडून आकाण्यात येणारे कर लाभार्थ्याने भरावेत, घराची देखभाल व दुरुस्ती ही लाभार्थ्याने स्वतः करावयाची आहे.
हेही वाचा – बांदा उपसरपंचपदी भाजपचे हर्षद कामत
या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त धनगर बांधवांनी लाभ घ्यावा. इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी केले आहे.
हेही वाचा – अबकी बार सिर्फ रोजगार यावर अजित अभ्यंकर म्हणाले,

News Story Feeds