राजापूर ( रत्नागिरी ) – कॅश काऊंटवरून रक्कम घेतल्यानंतर पैसे मोजायला दिलेल्या पैशातील काही रक्कम हातोहात लंपास करून एक चोरटा निसटल्याची घटना शहरातील एका बॅंकेत आज घडली. बॅंकेतील सीसीटीव्हीत तो चोरटा कैद झाला असला, तरी त्याचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत राजापूर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली नव्हती.
एका वृद्ध ग्राहकाने येथील एका बॅंकेतून सुमारे चाळीस हजाराची रोख रक्कम काढली. बॅंकेच्या कॅश काऊंटवरून पैसे घेतल्यानंतर ते मोजण्यासाठी ती रक्कम बाजूच्या बाकावर घेवून ते बसले. त्या ठिकाणी पैसे मोजत असतानाच त्याच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती बसली होती. त्या अनोळखी व्यक्तीने मी पैसे मोजून देतो असे त्या ग्राहकाला सांगून त्याच्या हातातील पैसे मोजायला सुरवात केली. त्या दरम्यान दोन – तीन शाई लागलेल्या नोटा सापडल्या होत्या. या खराब नोटा बदलून आणा, असे त्या अनोळखी व्यक्तीने वृद्ध ग्राहकाला सांगून काही मोजलेल्या नोटा त्याच्याकडे दिल्या. त्यानंतर नोटा बदलण्यासाठी ग्राहक पुन्हा काउंटरवर गेला. त्याचवेळी तो अनोळखी व्यक्ती बॅंकेतून निसटली.
शाई लागलेल्या नोटा बदलून तो ग्राहक परत त्या बाकाकडे आला असता तेथे कुणीच नव्हते. तो अनोळखी इसम तेथून निसटला होता. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्या ग्राहकाने बॅंक व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांना झाला प्रकार सांगितला. पोलीसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस बॅंकेत दाखल झाले. त्यांनी बॅंकेच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता तो अनोळखी चोरटा फुटेजमध्ये कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी नंतर शोधाशोध केली पण त्या चोरट्याचा पत्ता लागला नाही. चाळीस हजारापैकी अठरा हजार पाचशे रुपये त्या चोरट्याने लांबविले आहेत. मात्र तरीही चोरीबद्दल तक्रार नोंदविली गेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

News Story Feeds