रत्नागिरी : भाट्ये, आरे-वारे ही दोन पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज आणि लोकमान्य टिळक स्मारकाचा विकास केला जाणार आहे. किल्ल्यांच्या डागडुजीचा निर्णय झाला आहे. शिवनेरीच्या धर्तीवर मूळ स्वरूपात पूर्णगड आणि जयगड किल्ल्यांचा प्रायोगिक तत्त्वावर विकास केला जाईल, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘जिल्ह्याचा पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने मुंबईत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. जिल्हा नियोजनचा २०१ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील राजापूर, लांजा, गणपतीपुळे, खेड आणि दापोली विश्रामगृहांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. भाट्ये आणि आरे-वारे ही दोन्ही पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. त्यापैकी आरे-वारे येथे प्राणी संग्रहालय प्रस्तावित आहे. केंद्र शासनाने त्याला मंजुरी दिली की त्याची पुढील कार्यवाही सुरू होईल. माचाळ आणि मार्लेश्वरच्या विकासालाही निधी देण्यात येणार आहे.’’
हेही वाचा– अरे वा : आता देवरुखात उडणार सुखोई, मिराज….
लॅपटॉप खरेदीची चौकशी
यंत्रणेने सुचवायचे आणि आम्ही करायचे आता हा पायंडा बंद पडला आहे. आम्ही सुचवून यंत्रणेने करायचे आहे. म्हणून वाढीव एक कोटीच्या लॅपटॉप खरेदीचा प्रस्ताव मी हाणून पाडला. यापूर्वी दीड लाख खर्च करुन तलाठ्यांना लॅपटॉप दिले; मात्र त्याचे काय झाले, हे माहित नाही. सात-बारा उताऱ्यांचे किती काम झाले, ऑनलाईन सात-बारा मिळतो का, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या लॅपटॉप प्रकरणाची चौकशी करायला हवी, असे सामंत म्हणाले.
हेही वाचा– Republic Day 2020 : कोल्हापुरचा हा तरूण अभियंता फिरतोय संविधानाचे धडे घेऊन….
आंगणेवाडीसाठी १२ कोटी
जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी १५० कोटी देण्याचा निर्णय झाला. ‘सी वर्ल्ड’ प्रकल्प १२०० एकरांऐवजी आता ४०० ते ५०० एकरवर केला जाईल. मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. आंगणेवाडी परिसर सुशोभीकरणासाठी १२ कोटी रुपये मंजूर झाले, असे सामंत यांनी सांगितले.

News Story Feeds