रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर खेड, चिपळूणसह सावंतवाडी येथे सर्वच गाड्यांना थांबा मिळावा, अशा मागण्या सातत्याने येत आहेत. सावंतवाडीसंदर्भात प्रवासी संघटनेने आंदोलनही पुकारले आहे; मात्र सर्वच गाड्यांना थांबे दिले तर ते वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. तसेच परिस्थितीचा विचार करता, एकाच स्थानकावर थांबा देणे शक्य नाही, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून विविध मागण्या सातत्याने केल्या जात आहेत. त्यातील जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी तुतारी एक्स्प्रेसचे डबे वाढवणे, जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा देणे, यांसह सावंतवाडीत स्थानकात सगळ्या गाड्या थांबवल्या जाव्यात, या मागणीसाठी प्रवासी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची गंभीर दखल कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली. 15 डब्यांची तुतारी एक्स्प्रेस 19 डब्यांची करण्यात आली आहे. त्यासाठी दादर येथील प्लॅटफॉर्म वाढविला आहे. 19 डब्यांची गाडी प्लॅटफॉर्मवर लावणे पूर्वी अशक्य होते. शेवटच्या डब्यांमध्ये प्रवाशांना चढ – उतार करणे शक्य नव्हते. नवीन रचना करण्यासाठी मध्यरेल्वेबरोबर चर्चा केली होती. तसेच जनशताब्दी एक्स्प्रेसला सावतंवाडी स्थानकात थांब देण्यात आला आहे. तो कायमस्वरुपी राहील, असे कोरेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सर्वच गाड्या तिन्ही स्थानकात थांबविणे अशक्य मात्र, सावंतवाडी स्थानकात सर्वच गाड्या थांबविण्याच्या प्रश्नावर निर्णय घेणे अशक्य ठरत आहे. सावंतवाडीबरोबर खेड आणि चिपळूणमध्येही तशीच मागणी झाली होती. सावंतवाडीच्या तुलनेत उर्वरित दोन स्थानकांत प्रवाशांची गर्दी मोठ्याप्रमाणात असते. सर्वच गाड्या या तिन्ही स्थानकात थांबविणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रवासी भारमानाबरोबरच गाड्यांच्या वेळापत्रकाचा विचार करुनच थांबे ठरवले जातात. सावंतवाडीत गाडी थांबवली तर पुढे गाडीचे वेळापत्रक बिघडू शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गाड्यांच्या संख्येत तिपटीने वाढ
कोकण रेल्वेतर्फे गेल्या वीस वर्षांमध्ये मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येत तिपटीने वाढ करण्यात आली आहे व अनेक नवीन स्टेशन्स सोयीसुविधा इत्यादी दिल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासात होणाऱ्या सुधारणा ही एक संथ पण निश्चितपणे चालणारी प्रक्रिया आहे.

News Story Feeds