रत्नागिरी – येथून 25 किलोमीटरवर असलेल्या चिंद्रवली गावातील खेडकुळी येथे माघी गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. माघ शुक्ल प्रतिपदा ते चतुर्थी या चार दिवसांत येथे श्री गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. मंगळवारी (ता. 28) चतुर्थी हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे.
उत्सवात नित्य पूजा – अर्चा, आरत्या, भोवत्या, भजन, कीर्तन आणि प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पहाटे आरत्या, भोवत्या आणि लळिताच्या कीर्तनाने पारंपरिक पद्धतीने या उत्सवाची सांगता होणार आहे. या गणपती मंदिराला सुमारे 300 वर्षांची परंपरा लाभली असून तांबे घराण्याकडे या मंदिराची व्यवस्था आहे. याच घराण्यातील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्रीगुरू बालाजी तांबे यांनी त्यांचे माता, पिता श्री. वासुदेव धुंडिराज तांबेशास्त्री आणि सौ. लक्ष्मीबाई वा. तांबे यांच्या स्मरणार्थ या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. डॉ. तांबे आणि त्यांचे नातेवाइक उत्सवासाठी खेडकुळीमध्ये दाखल आले आहेत. अनेक वर्षांपासून ते या उत्सवासाठी खेडकुळी येथे येत आहेत.
पूर्वी खेडकुळीतील तांबे घराण्यातील लोक एकत्र येऊन उत्सव करत. या गणेशाची महती ऐकून आसपासच्या गावातील मंडळीही उत्सवाला नित्यनेमाने येऊ लागली. आज तीन – चार पिढ्या उत्सवाला येत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या महाप्रसादाची व्यवस्थाही तांबे कुटुंबीयांच्या घरी केली जाते. पावणारा गणपती म्हणून या मंदिराची ख्याती आहे. त्यामुळे मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल अनेक भाविक येथे येतात. त्याकरिता गुळाच्या ढेपा “श्रीं’ना अर्पण करण्याची प्रथा आजही जपली जाते. मंगळवारी श्रींना गुळाच्या ढेपा अर्पण केल्या जाणार आहेत.
झाशीच्या राणीचे आराध्य दैवत
झाशीची राणी लक्ष्मीबाई या मूळच्या कोलधे (ता. लांजा) येथील. या राणीनेही खेडकुळीतील स्वयंभू गणपतीचे दर्शन घेतले होते. खेडकुळीच्या दौऱ्यात तिने गावातील सुहासिनींची मोत्यांनी ओटी भरली होती, अशी आठवणही सांगितली जाते.

News Story Feeds