रत्नागिरी – शहराजवळील भाट्ये किनारी कुटुंबियांसह पर्यटनासाठी आलेल्या एका लहान मुलाच्या दोन्ही पायांना “जेली फिश” चा दंश झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. दंश झाल्यानंतर खाज सुटू लागल्यामुळे त्या मुलाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निखिल निशांत जयस्वाल (वय 9, रा. प्रतिभानगर, जि. कोल्हापूर) असे त्या मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास भाट्ये किनाऱ्यावर घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयस्वाल कुटुंबीय फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. भाट्ये किनाऱ्यावर फिरल्यानंतर दुपारी समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी सर्व कुटुंब उतरले. त्यावेळी निखिलही पाण्यात उतरला होता. तो किनाऱ्यालगत पाण्यात आंघोळ करत होता. त्याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या एका जेली फिश त्यांच्या पायांमध्ये आला. त्याचा दंश झाल्यामुळे निखिलला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पर्यटक जयस्वाल कुटुंबिय निखिलला घेऊन कोल्हापूर येथे रवाना झाले.
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील किनारी भागात मोठ्या प्रमाणात जेली फिश आढळून येत आहे. त्याची मच्छीमारांनाही अडचण होत असून जाळी फाटत आहेत. किनाऱ्यावर वाळूत असलेल्या या जेली फिशना स्पर्श झाल्यास किंवा त्यांना पाय लागल्यास त्यांच्या दंशाने तीव्र वेदना होतात. तापमानातील बदलामुळे जेलीफिश मोठ्याप्रमाणात किनाऱ्यावर येऊ लागतात. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचे एक कारण आहे. मान्सून वाऱ्यामुळे किंवा थंडीच्या कालावधीत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ब्लू बॉटल जेली फिश दिसत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
जेलीफिशचा दंश झाल्यास त्यावर समुद्राचे खारं पाणी टाकावं आणि लगेच सरकारी हॉस्पिटल गाठाव कारण त्योच त्वचेत रुतलेले काटे लवकर काढून टाकणे आवश्यक असते हा दंश झाल्यानंतर सुज येते आणि वेदनाही होतात. त्यामुळे घाबरुन न जाता पाण्यातून बाहेर यावे, त्यावर योग्य ते उपचार करावेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
एक विषारी तर एक बिनविषारी
जेलिफिशच्या दंशाने मज्जारज्जूसंस्थेवर (नर्व्हस सिस्टीमवर) परिणाम होतो. त्या माशाच्या काट्याबरोबर विष शरिरात जाते आणि अंगाला खाज सुटते. वेदनाही होतात. या माशाला मच्छीमार खारवट असे म्हणतात. कोकण किनारपट्टीवर दोन प्रकारचे जेलिफिश आढळतात. त्यातील एक विषारी तर एक बिनविषारी आहे.

News Story Feeds