रत्नागिरी – हापूसच्या निर्यात वृध्दीसाठी जास्तीत जास्त बागायतदारांनी पुढे यावे, यासाठी शासनाने मॅंगोनेट प्रणाली सुरु केली आहे. जानेवारीत सर्वाधिक नोंदणी झाली असून 937 नवीन आंबा बागायतदार निर्यातीसाठी सज्ज झाले आहेत. गेल्या सहा वर्षात 4,336 बागायतदारांनी मॅंगोनेटवर नोंदणी केली आहे.
मॅंगोनेटद्वारे जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात हापूस परदेशात निर्यात केला जातो; युरोप, जपान, अमेरिका येथील आयातदार रत्नागिरीतील थेट बागायतदारांच्या बागेत जाऊन पाहणी करतात. थेट संपर्कामुळे बागायतदारांनाही चांगला दर मिळतो. यासाठी मॅंगोनेट प्रणाली सहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. या प्रणालीसाठी पणनसह कृषी विभागाकडे मोठी जबाबदारी आहे. नाशिकमध्ये ग्रेप्सनेटच्या माध्यमातून द्राक्षांची निर्यात होते. त्याच धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी ‘मॅंगोनेट’ चा पर्याय सहा वर्षापूर्वी निवडण्यात आला.
नोंदणी दरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहे. त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस बागांचे व्यवस्थापन केले जाते. 2014-15 पासून मॅंगोनेट ही प्रणाली कार्यान्वित झाली. दरवर्षी नोंदणीकृत बागायतदारांना प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. फेब्रुवारीपर्यंत बागायतदारांना नोंदणी करता येते. जानेवारी अखेरपर्यंत नोंद करणाऱ्यांना अमेरिका, न्यूझीलंडमध्ये आंबा निर्यात करता होतो. मॅंगोनेटवर बागेची नोंद झाल्यानंतर फवारणी, खतांची स्थिती, कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील 937 बागायतदारांनी मॅंगोनेट अंतर्गत नोंदणी केली. तर 3,399 जणांनी प्रमाणपत्र नुतनीकरण केले.
2014-15 या वर्षात 1,706, 2015-16 मध्ये 234, 2016-17 मध्ये 193, 2017-18 मध्ये 33 नोंदणी केली होती. गतवर्षी 835 शेतकऱ्यांनी मॅंगोनेटची नव्याने नोंदणी केली होती. डिसेंबर अखेरपर्यंत अवघ्या पाच बागायतदारांचा प्रतिसाद लाभला होता; मात्र एप्रिलमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात येण्याची स्थिती असल्यामुळे निर्यातीवर भर देण्यासाठी बागायतदारांनी जानेवारीत नोंद केली.
मॅंगोनेट नोंदणी
तालुका…………..नवीन……… सहा वर्षातील नोंद
चिपळूण……….. 28…………… 111
दापोली……….. 228…………. 1046
गुहागर…………. 35……………120
खेड……………… 52………….. 324
लांजा……………… 9………….. 224
मंडणगड……….. 63…………… 231
राजापूर……….. 207……………818
रत्नागिरी………295…………. 1347
संगमेश्वर……….20……………..115
एकूण………….. 937………… 4336
दरवर्षी निर्यातीसाठी आंबा बागायतदारांची मानसिकता व्हावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे.
– भास्कर पाटील, सह व्यवस्थापक, पणन मंडळ

News Story Feeds