कडावल (सिंधुदूर्ग) : रांगणागडावर जाणाऱ्या नारूर येथील गेटवर बंदोबस्त तैनात करण्यात यावा, मुख्य गेटवर देखरेख व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच लाईट व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन उपवनसंरक्षकांनी दिले आहे.
जिल्ह्यातील गडकिल्ले हे शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती असून या पवित्र ठेव्याचे जतन होणे गरजेचे आहे. सुदैवाने या अनमोल ठेव्याच्या जपणूकीबाबत आजची युवा पिढी सजग झाली असून रांगणागडाचे संवर्धन कसे होईल, तेथील परिसर स्वच्छ कसा राहील, याबाबत येथील युवकांनी विचारमंथन सुरू केले असून या वास्तुच्या संरक्षणाबरोबरच पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी सकारात्मक व निर्णायक पावले टाकण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा– माडखोल ग्रामस्थं का म्हणाले कोणी पाणी देता का पाणी…..?
युवा पिढी झाली सजग
या उपक्रमाचा एक भाग म्हणून उपवनसंरक्षक चव्हाण यांना नारूर गावात खास निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. या गडावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. गडावर स्वच्छता रहावी यासाठी यापैकी काही पर्यटक प्रामाणिक प्रयत्न करतात; मात्र काहीजण मद्यपान करत प्लॅस्टिक पिशव्या तसेच अन्य टाकावू वस्तू गडावर टाकून परिसर अस्वच्छ करतात. या कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी येथील शिवप्रेमी युवकांनी मागणी उपवनसंरक्षकांकडे केली आहे.
हेही वाचा– १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत….? वाचा…
वनविभाकडून मागण्यांची दखल
उपवनसंरक्षक श्री. चव्हाण म्हणाले, ‘महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. गेल्या काही वर्षांपासून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत. भारतीय पुरातत्व विभागानेही गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही नियम व अटीशर्ती घालून दिल्या आहेत. गडावर येणाऱ्या प्रत्येकाने या नियमांचे कसोशिने पालन करावे. तसेच गडावर काही अपप्रवृती होत असतील तर त्याला आळा घालण्यासाठी वनविभागातर्फे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील.’

News Story Feeds