रत्नागिरी – भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा ऍड. दीपक पटवर्धन यांची निवड होण्याची शक्यता आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. भाजपच्या केंद्रीय निवडणुका झाल्यानंतर आता प्रदेश पातळीवरून सर्व जिल्ह्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली. उद्या रत्नागिरी जिल्ह्याची निवडणूक होणार आहे.
हेही वाचा – जिद्दी माऊंटेनिरिंगकडून रत्नदुर्गची स्वच्छता
उद्या (ता. 29) सकाळी 11 ते 12 या वेळेत रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनायाच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खासदार मनोज कोटक काम पाहणार आहेत. त्यांच्यासमवेत विधान परिषद आमदार प्रसाद लाड, संघटनमंत्री सतीश धोंड, माजी आमदार बाळ माने आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
स्वच्छ प्रतिमा, कामाचा धडाका, संपर्क आदी गोष्टी पाहता पुन्हा पटवर्धन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – जर्मन पर्यटकांकडून मांडवी किनाऱ्याची सफाई
याकरिता जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, मंडल अधिकारी, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष करण्याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. याचा अंतिम निर्णय अद्याप कळू शकलेला नाही. भाजप प्रदेशाकडून यासंदर्भात माहिती मिळालेली नाही. परंतु जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आल्याचे समजते. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

News Story Feeds