रत्नागिरी – जिल्हा कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी माजी उपनगराध्यक्ष संजय उर्फ बाळा मयेकर यांची निवड केली आहे. याबाबत त्यांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कॉंग्रेसभवन येथे प्रदान केले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या संजय मयेकर यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. उपनगराध्यक्ष व पाणी सभापती म्हणून त्यांनी पालिकेत प्रभावी काम करून दाखविले. कर्मचाऱ्यांना पाठबळ देऊन ते काम करून घेत होते. सामाजिक कार्यात त्यांचा वाटा आहे.
कॉंग्रेस अडचणीत असतानाही त्यांनी पक्षनिष्ठा दाखवून कॉंग्रेस वाढीसाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या कामाची आणि पक्षनिष्ठेची जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी दखल घेतली. जिल्हा कार्यकारिणीत बाळा मयेकर यांना सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या परवानगीने ही निवड केली आहे. निवडीचे पत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात आले. संजय मयेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

News Story Feeds