दाभोळ ( रत्नागिरी ) – मुंबई – गोवा महामार्गावर माणगावनजीक कळमजे पुलाजवळ परळ – दापोली या बसला 25 जानेवारी रोजी पहाटे भीषण अपघात झाला. याची दखल घेऊन दापोली आगाराने दापोली – परळ या मार्गावरील चालक वाहकांची सलग सेवा रद्द केली आहे.
अपघातानंतर प्रशासनाला शहाणपण आले आहे. हा अपघात झाल्यापासून 8 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या बसेस कोणत्याही अधिकाऱ्याने आदेश दिले तरी लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्यात येणार नसल्याची चर्चा दापोली आगारात सुरू आहे.
हेही वाचा – जिद्दी माऊंटेनिरिंगकडून रत्नदुर्गची स्वच्छता
अपघातापूर्वी दापोली – परळ ही दुपारी 12 वाजताची बस घेऊन परळ येथे जाणारे चालक व वाहक हे तीच बस घेऊन रात्री 11 वाजता परळ येथून दापोलीला येण्यासाठी निघत असल्याने त्यांना विश्रांती मिळत नसे. सलग बस चालवून चालकावर ताण येत असल्याने हा अपघात घडल्याने हा अपघात घडल्या दिवसापासून दापोली आगाराने आता या ड्यूटीत बदल केलेला असून दापोली – परळ घेऊन जाणारे चालक व वाहक आता तीच बस घेऊन परत येणार नाहीत. ते दुसऱ्या दिवशी अन्य बस घेऊन दापोलीत येतील.
हेही वाचा – जर्मन पर्यटकांकडून मांडवी किनाऱ्याची सफाई
या अपघातातील बसला (क्रमांक एमएच.14. बीटी. 0143) आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असूनही दुसरी चांगली बस दापोली आगारात नसल्याने ही बस 24 जानेवारी रोजी परळ येथे पाठविली होती. 24 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता ती परळ येथून सुटल्यावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पनवेल बसस्थानकात आल्यावर तिच्यात बिघाडही झाला होता. तो बिघाड दूर करून ती गाडी पनवेल येथून निघाली व तिचा पहाटे 5.30 वाजता माणगावनजीक कळमजे पुलाजवळ अपघात होऊन चालक व वाहकासह 28 प्रवासी जखमी झाले होते. गेल्या आठ वर्षांपासून दापोली आगाराला साध्या बसेस मिळालेल्याच नाहीत. त्यामुळे आहे त्याच बसेसची दुरुस्ती करुन त्या वापराव्या लागत आहेत.
दापोली – परळ ही दुपारी 12 ची बस घेऊन जाण्यासाठी अनेक चालक व वाहक उत्सुक असायचे. कारण तीच बस रात्री 11 वाजता परळ येथून दापोलीला परत यायचे असते. अन्य मुंबई ड्यूटी केली तर दुसऱ्या दिवशी रात्री परतावे लागते व मुंबईतील खर्च परवडत नसल्याने अनेकांना हीच ड्यूटी करणे सोईस्कर होते. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार कोणीच करत नव्हते. या अपघातामुळे का होईना आता या ड्यूटीत बदल केला आहे.

News Story Feeds