सिंधुदुर्गनगरी – जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2018-19 मध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आज त्यांची नावे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
आदर्श ग्रामसवक पुरस्कार जाहीर करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष नाईक बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती सावी लोके, महिला व बाल विकास समिति सभापती माधुरी बांदेकर, ग्रापंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा – रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी संजय मयेकर
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे रहाणीमान उंचावल्यास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने 2018-19 या आर्थिक वर्षासाठीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातून ग्रामसेवकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.
एका गटातून एक याप्रमाणे आठ तालुक्यातून प्रत्येकी एकप्रमाणे आठ प्रस्तावांचे गुणांक करण्यात आले. त्यानुसार सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामसेवकांची निवड समितीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी केली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी दिली.
हेही वाचा – जिद्दी माऊंटेनिरिंगकडून रत्नदुर्गची स्वच्छता
यात दोडामार्ग तालुक्यातील लक्ष्मण पवार (ग्रामसेवक विर्डी), देवगड-शिवराज राठोड (ग्रामसेवक बापार्डे), कणकवली-वर्षा जाधव (ग्रामसेवक करंजे), मालवण-अशोक पाटील (ग्रामसेवक चौके), कुडाळ-अनंत गावकर (ग्रामविकास अधिकारी), वेंगुर्ला-मंगेश नाईक (ग्रामसेवक भोगवे/चिपी), वैभववाडी-उमेश राठोड (ग्रामसेवक मांगवली-एडगाव) तर सावंतवाडी बापूसाहेब फुंदे (ग्रामसेवक तळवणे) या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच एका कार्यक्रमात त्यांना सन्मान पूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी स्पष्ट केले.

News Story Feeds