दाभोळ ( रत्नागिरी ) – भाजपच्या दापोली तालुकाध्यक्षपदी मकरंद म्हादलेकर यांची निवड करण्यात आली. श्रीराम (भाऊ) इदाते यांचा तालुकाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने नूतन तालुकाध्यक्ष निवडण्यासाठी शहरातील श्री मंगल कार्यालय येथे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याची बैठक झाली.
हेही वाचा – राजापुरात 51 ग्रामपंचायतीच्या निवडणूका मे मध्ये
बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक राजूभाई रेडीज व जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. माजी तालुकाध्यक्ष बावाशेठ केळसकर यांनी तालुकाध्यक्षपदी मकरंद म्हादलेकर यांचे नाव सुचविले. त्याला तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पावसे व लऊ साळुंके यांनी अनुमोदन दिले. मकरंद म्हादलेकर यांच्याकडे यापूर्वी भाजपाचे दापोली तालुका सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदारसंघात त्यांनी विस्तारक म्हणून काम केले आहे.
हेही वाचा – शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून दुर्लक्षित मंदिराची साफसफाई
तालुक्यातील 191 बुथपर्यंत भाजप सक्षमपणे वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसह अन्य निवडणूका स्वबळावर लढविणार आहोत. जे सोबत येतील, त्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार विजयी करणार आहे.
– मकरंद म्हादलेकर, नुतन तालुकाध्यक्ष, भाजप

News Story Feeds