कुडाळ (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ३२ व्या व्यापारी एकता मेळाव्यात दिली. जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा येथील बाबा वर्दम थिएटरमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘सध्या व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्या वतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने मांडलेल्या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत विशेष बैठक आयोजन करून व्यापाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा– रत्नागिरी जिल्हा परिषद आढावा बैठकीत ही चुक आली समोर
फूट पडू देऊ नका
व्यापारी आमदार नसले तरी आमदार कोणाला बनवायचे, ही ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्यातली ताकद ओळखावी. तुमची संघटना मोठी आहे. तुमच्या संघटनेत फूट पाडण्याचे काम कोणाला करू देऊ नका. नाहीतर कोणीही तुमच्या संघटनेवर येऊन आपला झेंडा रोवू पाहील, याची काळजी घ्या. भविष्यात तुमची ताकद तुम्ही ओळखल्यास पुढारी, नेते तुमच्यापर्यंत येतील.’’ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात कुठेही काही घटना घडली की त्याचा राग व्यापाऱ्यांवर काढून त्यांची शटरे बंद केली जातात म्हणजे शंभर टक्के बंद यशस्वी झाला, असे सांगितले जाते.
हेही वाचा– ग्रामस्थांच्या एकीने सुटला हा मोठा प्रश्न….
सेलना परवानगी द्यावी.
काही जण जबरदस्तीने दुकानांची शटर बंद करून आपल्या नेत्यांसमोर मिरवतात. हा इतिहास सिंधुदुर्गात काही नवीन नाही; मात्र मी सिंधुदुर्गातीलच आहे. अशा पद्धतीने व्यापाऱ्यांची शटर बंद करण्याचा प्रयत्न यापुढे कोणीही करू नये.
व्यापाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.’’श्री. तायशेटे म्हणाले, ‘‘व्यापाऱ्यांवर ऑनलाईन कंपन्या, सेल यांचे आक्रमण वाढत आहे. त्याला वेळीच आळा बसावा. लोकसंख्येच्या निकषानुसार मोठ मोठ्या सेलना परवानगी द्यावी. टोल नाक्यावर जिल्ह्यातील वाहनांना सवलत द्यावी, पर्यटन जिल्ह्याचे फायदे व्यापाऱ्यांना मिळावेत.’’
हेही वाचा– खेडमधील त्या तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप
उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष ओंकार तेली, सभापती नूतन आईर, प्रमुख वक्ते विनित बनसोडे, विनोद मेस्त्री, कार्यवाह निलेश धडाम, तालुकाध्यक्ष संजय भोगटे, कार्यवाह पी. डी. शिरसाट, अवधुत शिरसाट, कोषाध्यक्ष प्रसाद धडाम, अनुप तेली, कार्यकारणी सदस्य सदगुरू तांडेल, सुनील सौदागर, एम आयडीसी असोसिएशन अध्यक्ष आनंद बांदिवडेकर व्दारकानाथ घुर्ये आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष संजय भोगटे यांनी आभार मानले.

News Story Feeds