रत्नागिरी : चेसमेन रत्नागिरी व केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (कै.) सप्रे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत 45 बुद्धिबळपटूंना जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) यांच्याकडून जलद प्रकारातील मानांकन प्राप्त झाले. यापैकी बिगर मानांकित 20 खेळाडूंना नवीन जलद मानांकन तर क्लासिकल प्रकारात मानांकन असणाऱ्या 25 खेळाडूंना जलद प्रकारातील गुणांकन प्राप्त झाले.
आज ता. 1 रोजी जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर या सर्व बुद्धिबळपटूंच्या परफॉर्मन्सची नोंद प्रसारित झाली. जयगड येथील जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने व (कै.) सप्रे कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर चेसमेनने ही स्पर्धा 18 व 19 जानेवारीला घेतली. या स्पर्धेत देशभरातून तब्बल 230 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा– अखेर सापडलाच हा मास्टर माईंड….
संकेतस्थळावर नोंद
बिगरमानांकित 10 खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. यात अंकित खेडेकरने सर्वाधिक 1400 तर दिया सावळ हिने 1351 गुणांकन प्राप्त केले. सौरीश कशेळकरने 1233, माधव काणे 1218 गुणांकनासह जिल्ह्यातील नवोदित गुणांकन प्राप्त खेळाडूंमध्ये वर्चस्व राखले. रत्नागिरीच्या प्रसाद तेंडुलकर, राज नारकर यांना तर खेडच्या कारुण्य जाधव, यश खामकर, चिपळूणचा विराज खामकर, राजापूरचे मोहसीन सय्यद आणि अमृत तांबडे यांना फिडे गुणांकन मिळाले.
हेही वाचा– चंद्रकांत पाटीलांची मिळाली सूचना आणि लगेच भाजप प्रेमींनी देवीला घातले साकडे..
क्लासिकलमध्ये 7 जणांना गुणांकन
क्लासिकल प्रकारात रत्नागिरीतील 7 खेळाडूंना गुणांकन मिळाले. यात सुहास कामतेकर यांनी 1364 तर वरद पेठे याने 1352 गुणांकन मिळवत वर्चस्व राखले. क्रीश डोईफोडे, सुश्रुत करंदीकर, आशय मयेकर, विनायक देवस्थळी यांना जलद फिडे गुणांकन प्राप्त झाले आहे.
हेही वाचा– या विमानांच्या दुनियेत रमली देवरुखातील विदयार्थी….
चेसमेन, केजीएनला आला हुरुप
नवोदित गुणांकन प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करताना रत्नागिरीत होणाऱ्या अशा स्पर्धांमधून जिल्ह्यातील गुणवान खेळाडूंना जिल्ह्याबाहेर न जाता मानांकन मिळाल्यामुळे आम्हालाही हुरूप आला आहे. अशा प्रकारच्या आणि क्लासिकल प्रकारच्या मानांकन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर आणि केजीएन सरस्वतीचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले.

News Story Feeds