दोडामार्ग (सिंधूदुर्ग) : तेरवण मेढे ग्रामपंचायतीसाठी 5 तारखेपर्यंत कायमस्वरूपी तलाठी न दिल्यास 6 पासून तहसीलसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच प्रवीण गवस यांनी तहसीलदारांना दिला आहे.
हेही वाचा– माथेरानला जायची इच्छा आहे पण…
तेरवण मेढे येथे कायमस्वरूपी तलाठी नाही. ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते सतत सातबारा संगणीकरणाच्या नावाखाली तालुक्याच्या ठिकाणी जात असतात. त्या तलाठ्याकडे तेरवण, तेरवण मेढे, सोनावल, पाळये, आयनोडे, हेवाळे आदी गावांचा कार्यभार आहे. त्या गावातील गावकरी अनेक कामांसाठी तेरवण मेढे येथे येतात; पण तलाठी मिळत नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो.
हेही वाचा- बापरे ! काडवलीत वर्षाने मिळाले पाणी…
कायमस्वरूपी तलाठी हवा
तेरवण आणि तेरवण मेढे यात चाळीस किलोमीटरचे अंतर आहे. तेवढे अंतर कापून येणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्या अभावी गैरसोय होते. त्यांना परत जायला वेळेत गाडी मिळाली नाही तर पायपीट करावी लागते. नाहीतर अव्वाच्या सव्वा पैसे मोजून घर गाठावे लागते. त्या सगळ्या बाबींचा विचार करुन कायमस्वरूपी तलाठी द्यावा अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा श्री. गवस यांनी दिला आहे.

News Story Feeds