राजापूर (रत्नागिरी) : “शिक्षक वाटती मतदार स्लिपा, विद्यार्थी काढती शाळेत झोपा’, “शिक्षक नाही वेठबिगार, त्यालाही आहे घर संसार’, “शिक्षक झाले बीएएलओ गुणवत्ता होईल फेल हो’ अशा जोरदार घोषणा देत प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आंदोलन छेडले. यावेळी शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळण्याची मागणीही करण्यात आली.
निवडणुकीच्या कामासाठी बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या कामासाठी शिक्षक संघटनांकडून विरोध केला जात असून या कामातून शिक्षकांना वगळावे, अशी मागणी केली जात आहे. शिक्षकांच्या मागणीनंतरही महसूल प्रशासनाकडून शिक्षकांच्या बीएलओ कामासाठी नियुक्त्या केल्या आहेत. त्यातून संघर्ष वाढला आहे.
हेही वाचा– रत्नागिरीतील या 45 जणांची जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर झाली नोंद….
घोषणांनी लक्ष वेधले
बीएलओच्या कामातून वगळण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आंदोलन छेडले. विविध घोषणा देवून शिक्षकांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. या वेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित, तालुकाध्यक्ष विजय खांडेकर, दीपक धामापूरकर, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक विलास जाधव, भास्कर गुरसाळे, प्रकाश परवडे, समीर देशपांडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा– तेरवणच्या झाडाचा बोर्ड आला चर्चेत…
काम लादल्याचा आरोप
न्यायालय व निवडणूक आयोगाने बीएलओ कामी शिक्षकांची सेवा घेणे टाळण्याच्या सूचना दिलेल्या असताना निवडणूक विभागाकडून शैक्षणिक घडी विस्कळित करून शिक्षकांना नोटीसा बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देऊन बीएलओचे काम लादल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

News Story Feeds