रत्नागिरी : चीनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूमुळे न्युमोनियाचे झालेले रुग्ण भारतात आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासन सतर्क झाले असून रत्नागिरी जिल्हा परिषदेनेही चीनमधून आलेल्या किंवा करोना विषाणूमुळे बाधित राज्यातून आलेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत.
करोनाशी मिळत्याजुळत्या आजारी रुग्णांच्या नोंदी प्रत्येक दिवशी घेण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
चीनमधील हुबेई प्रांतातील कहान शहरात नव्याने आढळलेल्या करोना विषाणूमुळे न्युमोनियाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबई, दिल्ली व कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरू केले आहे. सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्ससारख्या गंभीर आजारास कारणीभूत विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास करोना विषाणू म्हटले जाते. रुग्णाच्या लक्षणानुसार उपचार करावा. रुग्णाला सहाय्यभूत ठरणारी निगा अत्यंत प्रभावी ठरते. त्यासाठी लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा– माथेरानला जायची इच्छा आहे पण…
करोनावर उपाय
श्वसनसंस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे, न शिजविलेले अथवा अपुरे शिजविलेले मांस खाऊ नये, फळे, भाज्या न धुता खाऊ नये, खोकताना-शिंकताना नाका-तोंडासमोर रुमाल/टिश्यूपेपरचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा– चंद्रकांत पाटीलांची मिळाली सूचना आणि लगेच भाजप प्रेमींनी देवीला घातले साकडे..
विशेष कक्ष सुरु
करोना रोगावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने करोना किट बनवले आहे. त्या किटची मागणी जिल्हा परिषदेने केली आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रत्येकी दहा कीट, तालुकास्तरावर दहा आणि जिल्हास्तरावर वीस टक्के किट ठेवण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष सुरु केला जाणार आहे. प्रत्येक दिवशी सकाळी 11 वाजता याची माहिती तालुक्यातून घेतली जाईल.
हेही वाचा– या विमानांच्या दुनियेत रमली देवरुखातील विदयार्थी….
बाधित लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद
परदेशातून जिल्ह्यातील बंदरांवर येणाऱ्या जहाजांवरील खलाशी किंवा अधिकाऱ्यांमार्फत या विषाणूने बाधित रुग्ण येण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे बाधित लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना द्यावी, असे पत्र बंदर विभागाला देण्यात येणार आहे. त्यात चार बंदरांचा समावेश आहे.
.

News Story Feeds