ओरोस ( सिंधुदुर्ग ) – राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे पहिलेच अधिवेशन आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 8 ला मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष पाताडे यांच्यावतीने केले आहे.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अमित देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक भारतीचे पहिलेच अधिवेशन या संघटनेचे नेते आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होत आहे.
या अधिवेशनात 25 मागण्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शिक्षकांच्या अडीअडचणीं विषयी चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष दया नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, मुख्य संघटक महेश नाईक, लक्ष्मीकांत कराड, मंगेश खांबाळकर या शिक्षक भरती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून 6 ते 8 फेब्रुवारी या तीन दिवसासाठीची विशेष अधिवेशन रजा मंजूर करण्यात आली असून या अधिवेशनाला जिल्ह्यातील चारशे ते पाचशे शिक्षक उपस्थित राहणार आहेत, असेही या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
अधिवेशनातील प्रमुख मागण्या
- 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- वस्तीशाळा शिक्षकांची मूळ दिनांकापासून सेवा वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरावी.
- कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत.
- शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत.
- शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी.
- शिक्षण सेवकाला 21 हजार रुपये मानधन देण्यात यावे.
- अप्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी.

News Story Feeds