रत्नागिरी – सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत जीपीएसद्वारे निश्चित करण्यात ग्रामपंचायतींकडून अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्यापही 2,134 स्रोत जीपीएसवर आलेले नाहीत. ही कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचना जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील स्रोत जीपीएसवर आणण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात मुख्यत्वे ग्रामीण जनतेला सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे यासाठी जिल्ह्यातील स्रोत निश्चित करून त्याची माहिती जीपीएसद्वारे पोर्टलवर टॅगिंग करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. त्यानुसार गेले दोन वर्षे त्याची माहिती पोर्टलवर घेतली जात आहे. यामध्ये नळपाणी योजना, विहिरी, झरे, हातपंप यांचा समावेश आहे.
हेही वाचा – बिग बास्केटकडून हापूससह काजू बी खरेदी
ऑफलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यात 7 हजार 790 स्रोत आहेत. पहिल्या टप्प्यात 3 हजार 802 स्रोतांची माहिती एका क्लिकवर आणली गेली. गतवर्षी 1 हजार 866 स्रोत जिओ टॅगिंग करण्यात आले; मात्र अद्यापही 2,134 स्रोतांचे जीओ टॅंगिंग करण्यात यश आलेले नाही.
या पोर्टलवर स्रोत दूषित केव्हा झाले होते, पाणी शुद्धीकरण केव्हा करण्यात आले, सद्यस्थितीत त्याचा वापर होतो किंवा नाही, जिओ टॅगिंग कुणी केले आहे, याची सविस्तर माहिती मिळणार आहे. माहिती एका ठिकाणी संकलित असल्यामुळे राष्ट्रीय पेयजल अंतर्गत पाण्याचे स्रोत शोधण्याची आवश्यकता लागणार नाही. कायमस्वरुपी बंद असलेले स्रोतही जिओ टॅगिंग केले जात आहेत. जेणेकरुन त्यावरुन पाणीपुरवठा योजना राबविल्या जाणार नाहीत.
हेही वाचा – प्राथमिक शिक्षक भारतीचे 8 ला मुंबई येथे अधिवेशन
नमुने घेण्यासाठी माणसेच मिळत नाहीत..
दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींत स्रोतांच्या ठिकाणी जावून नमुने घेण्यासाठी माणसेच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या कामासाठी मिळणारे मानधन पुरेसे नसल्याने अडचणी येतात. याबाबत गांभीर्याने कार्यवाही व्हावी, अशी सूचना स्वच्छता विभागाकडून देण्यात आली आहे.
जीपीएसवर नसलेले स्त्रोत:
तालुका* पाण्याचे स्रोत
दापोली* 0
मंडणगड * 74
गुहागर * 113
रत्नागिरी* 141
लांजा* 223
संगमेश्वर* 141
राजापूर* 235
खेड * 531
चिपळूण * 676

News Story Feeds