रत्नागिरी – तिवरे (ता. चिपळूण) धरणफुटी प्रकरणानंतर धोकादायक धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने शीघ्र पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 34 धरणांचा सर्व्हे झाला. यामध्ये धोकादायक ठरलेल्या 16 धरणांची दुरूस्ती आणि सुरक्षेसाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणांची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करून ती सुरक्षित केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. म. पाटील यांनी दिली.
हेही वाचा – रत्नागिरी जिल्ह्यात होणार कालव्यांचे 250 किमीचे जाळे
गेल्या पावसाळ्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत धरणाखालील बाजूचे तिवरे गाव वाहून नामशेष झाले. या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकटी करण्यात आली. चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालात धरण दुर्घटनेला जबाबदार कोण हे निश्चित होणार आहे.
हेही वाचा – मुंबई गोवा मार्गावर येथे होतोय सर्वात मोठा भुयारी मार्ग
तिवरे दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले. खबरदारी म्हणून पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील 34 धरणांचे सर्वेक्षण केले. जुलै 2019 मध्ये सर्व धरणांना भेटी देऊन धरणांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात पाटबंधारे विभागाच्या 34 पैकी 16 धरणे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या सोळा धरणांपैकी काही धरणांना गळत्या, सांडवा नादुरूस्त, गेट लिकेज यासारख्या समस्या होत्या. या सर्व बाबी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तपासणी अहवालात नमूद केल्या.
हेही वाचा – खुषखबर ! पाचल ग्रामपंचायतीतर्फे शेतकऱ्यांसाठी हे केंद्र
या धरणांच्या नादुरूस्तीचा प्रस्ताव तत्काळ राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. नादुरूस्त असलेल्या सोळा धरणांमध्ये पिंपळवाडी, मोरवणे, कोंडीवली, कळवंडे, खोपट, निवे-तेलेवाडी, चिखलगाव, वेळगवाने आदी सोळा धरणांचा समावेश होता. पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या धरण दुरूस्तीच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेऊन धरण सुरक्षेसाठी 10 कोटीचा निधी मंजूर केला. या दहा कोटीपैकी नऊ कोटी सिव्हिल वर्क तर एक कोटी यांत्रिकी कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. सोळा धरणांच्या दुरूस्ती कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच धरण दुरूस्तींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व धरणांची दुरूस्ती केली जाईल. तसेच सोळा धरणांवर देखभालीसाठी एजन्सीदेखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – धक्कादायक ! `येथे` सीलबंद बाटलीऐवजी नळाच्या पाण्याची विक्री

News Story Feeds