रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) धरणफुटी प्रकरणानंतर धोकादायक धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने शीघ्र पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३४ धरणांचा सर्व्हे झाला. यामध्ये धोकादायक ठरलेल्या १६ धरणांची दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून ती सुरक्षित केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. म. पाटील यांनी दिली. गेल्या पावसाळ्यात चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण फुटल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत धरणाखालील बाजूचे तिवरे गाव वाहून नामशेष झाले. या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून, या अहवालात धरण दुर्घटनेला जबाबदार कोण, हे निश्‍चित होणार आहे.

हेही वाचा– सॅनेटरी नॅपकिनची नोंद  झाली लिम्का बुकमध्ये…

तिवरे दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले. खबरदारी म्हणून पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ३४ धरणांचे सर्वेक्षण केले. जुलै २०१९ मध्ये सर्व धरणांना भेटी देऊन धरणांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात पाटबंधारे विभागाच्या ३४ पैकी १६ धरणे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या सोळा धरणांपैकी काही धरणांना गळत्या, सांडवा नादुरुस्त, गेट लिकेज यासारख्या समस्या होत्या. या सर्व बाबी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तपासणी अहवालात नमूद केल्या.

हेही वाचा– महविकास आघाडीचा फडणवीसांना दणका :  ही योजना केली बंद..

सोळा धरणांच्या दुरुस्ती कामाची निविदा प्रसिद्ध

या धरणांच्या नादुरुस्तीचा प्रस्ताव तत्काळ राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. नादुरुस्त असलेल्या सोळा धरणांमध्ये पिंपळवाडी, मोरवणे, कोंडीवली, कळवंडे, खोपट, निवे-तेलेवाडी, चिखलगाव, वेळगवाने आदी सोळा धरणांचा समावेश होता. पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या धरण दुरुस्तीच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेऊन धरण सुरक्षेसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला. या दहा कोटींपैकी नऊ कोटी सिव्हिल वर्क तर एक कोटी यांत्रिकी कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. सोळा धरणांच्या दुरुस्ती कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, लवकरच धरण दुरुस्तींची कामे हाती घेण्यात येणार आहेत.पावसाळ्यापूर्वी सर्व धरणांची दुरुस्ती केली जाईल. तसेच सोळा धरणांवर देखभालीसाठी एजन्सीदेखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

News Item ID:
599-news_story-1581056106
Mobile Device Headline:
'ही' 16 धरणे घेणार आता मोकळा श्वास…..
Appearance Status Tags:
1 crore sanctioned for security 16 dam in sindudurg kokan marathi news
Mobile Body:

Vertical Image:
English Headline:
1 crore sanctioned for security 16 dam in sindudurg kokan marathi news
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
चिपळूण, धरण, विभाग, Sections, तिवरे धरण, Tiware Dam
Twitter Publish:
Meta Keyword:
sindudurg kokan dam news
Meta Description:
1 crore sanctioned for security 16 dam in sindudurg kokan marathi news
तिवरे (ता. चिपळूण) धरणफुटी प्रकरणानंतर धोकादायक धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने शीघ्र पावले उचलली आहेत…
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here